काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा

मागील काही काळापासून राष्ट्रवादीला मोठी गळती लागली असून अनेक नेते सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यानंतर आता काँग्रेसचीही गळती सुरु झाल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा
Follow us
| Updated on: Jul 29, 2019 | 11:09 PM

सोलापूर : मागील काही काळापासून राष्ट्रवादीला मोठी गळती लागली असून अनेक नेते सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यानंतर आता काँग्रेसचीही गळती सुरु झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसकडून आज सोलापूरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीला अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांनी थेट दांडी मारली. त्यामुळे म्हेत्रे आणि भालके यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी नुकतीच आपल्या समर्थकांची बैठक घेऊन आपण काँग्रेसमध्ये समाधानी नसल्याचं सांगितलं होतं. त्यांनी मुंबई येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती. तेव्हापासूनच म्हेत्रे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आजच्या मुलाखतीला म्हेत्रेंनी दांडी मारल्याने त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे पंढरपूरचे आमदार भारत भालके देखील काही दिवसांपासून मुख्यमंत्र्याच्या संपर्कात आहेत. तेही भाजपच्या गोटात दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यांनीही आज मुलाखतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे भारत भालके देखील भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे 3 आमदार आहेत. त्यापैकी एकमेव प्रणिती शिंदे यांनी मुलाखतीला हजर राहून सोलापूर शहरातून (मध्य) उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं.

नुकतेच राष्ट्रवादी पक्षाकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या मुलाखतीला बार्शीचे दिलीप सोपल, माढ्याचे बबन शिंदे या 2 आमदारांनी दांडी मारली होती. त्यामुळे बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे भाजपच्या वाटेवर, तर दिलीप सोपल हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं गेलं. आता काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी दांडी मारल्याने जिल्ह्यातील 4 आमदार युतीच्या गळाला लागणार असल्याची जोरदार चर्चा सोलापूरमध्ये सुरु आहे.

दरम्यान, नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही 29 जुलै  रोजी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोळंबकरांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. यानंतर बुधवारी 31 जुलैला कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

संबंधित बातम्या:

कालिदास कोळंबकरांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजप प्रवेशाची तारीख ठरली

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.