Uday Samant | विरोधी पक्षांकडून राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन, उदय सामंतांची मनसे, भाजपवर टीका

शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी वीजबिलप्रश्नी आंदोलन करणाऱ्या मनसे आणि भाजपवर टीका केली आहे. Uday Samant MNS ,BJP

Uday Samant | विरोधी पक्षांकडून राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन, उदय सामंतांची मनसे, भाजपवर टीका
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 7:21 PM

मुंबई : राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी वीजबिलप्रश्नी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं चालू झालेली आहेत आणि ही आंदोलनं चालू करण्यामागं स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवणं हा उद्देश असल्याची टीका उदय सामंतानी केली होती. ठाकरे सरकार मनसेच्या मोर्चाला घाबरतं, वीज बिल कमी केली नाही तर हे नपुंसक सरकार उखाडून फेकून देऊ, अशी जळजळीत टीका मनसेच्या नेत्यांनी केली होती. त्या टीकेला उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ( Uday Samant gave answer to MNS and BJP over Electricity Bill issue)

वीजबिलाच्याबाबतीमध्येजे मुद्दे ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी भूमिका मांडलेली आहे. वीज बिलामधली तक्रार असेल किंवा त्यामधला फरक असेल किंवा जो काही अन्याय झालेला आहे, त्या ग्राहकांवरील अन्याय दूर करण्यासाठी ऊर्जा खातं  प्रामाणिकपणे काम करत आहे. ऊर्जा खाते योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले होते. ऊर्जा खात्याच्या निर्णयानंतर जी काही फरकाची रक्कम असेल तीसुद्धा अ‌ॅडजेस्ट करून देणार आहे, अशी नितीन रावतांनी भूमिका मांडलेली होती, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

श्रेयवादासाठी आंदोलनं

काही विरोधकांना राज्यात होत असलेले निर्णय त्यांच्यामुळे होत असल्याचे वाटते.  देऊळ उघडण्याच्या वेळी  आपण बघितले असेल ज्यावेळी त्यांना असं वाटलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब देऊळ उघडण्याची घोषणा करणार आहेत. त्या अगोदरच काही लोकांनी आंदोलन केलं. त्यामुळे एखादी चांगली गोष्ट घडत असेल ती आमच्यामुळे घडते हे दाखवण्यासाठी हे चाललं आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.( Uday Samant gave answer to MNS and BJP over Electricity Bill issue)

महाराष्ट्र सरकारने एमएमआरडीएचे 100 कोटी रूपये टॉप सिक्युरिटीतले वळवले. त्या पैशातून विदेशात प्रॉपर्टी विकत  घेण्यात आल्या, तो पैसा अनेक कंपन्यात डायवर्ट झाला, असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. याबद्दल विचारले असता  टॉप सिक्युरिटीला महाराष्ट्र शासनानं काय दिलं? कोणी काही दिलं? याची कल्पना नसल्याचे उदय सामंताांनी स्पष्ट केले.  सर्व प्रकरणांची चौकशी सुरु आहे. ज्यांच्यावर आरोप ते चौकशीला देखील सामोरे जाणार असल्याची भूमिका जर ज्याची चौकशीची होत आहे त्यांची असेल तर काही बोलायची गरज नाही, असं उदय सामंत म्हणाले.

संबंधित बातम्या: 

प्रस्तावित मेडिकल कॉलेजवरुन शिवसेनेच्या 2 नेत्यांमध्ये स्पर्धा, मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम आमनेसामने

उदय सामंतांची श्रीकांत देशपांडेंच्या प्रचारार्थ सभा, अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या

( Uday Samant gave answer to MNS and BJP over Electricity Bill issue)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.