उद्धव ठाकरेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम, विधानसभा अध्यक्षपदाबद्दल तेच ठरवतील : उदय सामंत

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज असल्याची माहिती आहे. (Uday Samant Vidhansabha Speaker )

उद्धव ठाकरेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम, विधानसभा अध्यक्षपदाबद्दल तेच ठरवतील : उदय सामंत
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 9:03 AM

नागपूर : नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ठरवतील, त्यांचा शब्द शिवसैनिकांसाठी अंतिम असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. (Uday Samant reacts on Vidhansabha Speaker says Uddhav Thackeray will decide)

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज असल्याची माहिती आहे. खासकरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांच्या राजीनाम्याबाबत नापंसती व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थिर होत असतानाच त्यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचं म्हटलं जातं.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्याने अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष बदलताना काँग्रेसने आमच्याशी चर्चा केली होती. अध्यक्षपद तिन्ही पक्षाचं असल्याने आता ते खुलं झालं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कोण असणार? यावर पुन्हा चर्चा होणार आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं आहे. पवारांनी अत्यंत मोजक्याच शब्दात पण अत्यंत मुद्देसुद भाष्य केलं आहे. पवारांची ही तीन वाक्ये काट्यासारखी टोकदार असल्याने त्याने आघाडीतल कोणता पक्ष घायाळ होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

के. सी. पाडवी होणार नवे विधानसभा अध्यक्ष?

नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच रहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र हे पद आता खुलं झालं आहे असं म्हटलं होतं. पण कुणाकडे कुठली पदं राहतील हे सरकार बनतानाच निश्चित झालं आहे आणि त्यात फार बदल होण्याची शक्यता नसल्याचं जाणकारांना वाटतं. त्यामुळे काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आदिवासी मंत्री कागदा चांद्या पाडवी म्हणजेच के. सी. पाडवी (K C Padvi) यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.

पाडवी हे काँग्रेस निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. अलिकडेच सोनियांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, आदिवासी, मागास वर्गासाठी खास निधीची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर पाडवींना अध्यक्ष केलं तर आदिवासी समाजात चांगला मेसेज पोहोचेल असं गणित मांडलं जात आहे. (Uday Samant reacts on Vidhansabha Speaker says Uddhav Thackeray will decide)

शिवसेनेचं इंधन दरवाढीवर आंदोलन

केंद्र सरकारने अच्छे दिनचा वादा केला होता. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करण्याचं आश्वासन देऊन भाजपने केंद्रात सत्ता आणली. मात्र किती अच्छे दिन आले, हे सर्वांनाच माहित आहे. आता इंधनाची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांवर परिणाम होत आहे. म्हणून पक्षप्रमुखांच्या आदेशाने आज शिवसेना इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करत आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

इंधन दरवाढीवर शिवसेना आंदोलन करत आहे, म्हणून भाजप काही तरी वीज तोडणीविरोधात आंदोलन करत आहे. भाजपचं आंदोलन केवळ दाखवण्यासाठी आहे, असा टोला उदय सामंतांनी लगावला.

संबंधित बातम्या :

पवार काय बोलत आहेत त्यावर बोलणार नाही, पण तिघांशी बोलून निर्णय-पटोले

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज?

(Uday Samant reacts on Vidhansabha Speaker says Uddhav Thackeray will decide)

बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.