AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर वाटेल ती किंमत मोजेल, मी कोणाच्याही घराची चौकशी केली नाही; राणेंच्या टीकेला सामंतांचे प्रत्युत्तर

नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईच्या जुहूमधील बंगल्याची काल महापालिकेच्या  अधिकाऱ्यांनी पहाणी केली. या बंगल्याचे काही बांधकाम अतिक्रमणात जात असल्याचा आरोप आहे. दरम्यान यानंतर नारायण राणे यांच्याकडून उदय सामंत (Uday Sammat) आणि शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे. राणे यांच्या आरोपांना उदय सामंत यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

...तर वाटेल ती किंमत मोजेल, मी कोणाच्याही घराची चौकशी केली नाही; राणेंच्या टीकेला सामंतांचे प्रत्युत्तर
राष्ट्रीय सेवा योजनेसाठी अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची तरतूद
| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 8:58 PM
Share

रत्नागिरी : नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईच्या जुहूमधील बंगल्याची काल महापालिकेच्या  अधिकाऱ्यांनी पहाणी केली. या बंगल्याचे काही बांधकाम अतिक्रमणात जात असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) अधिकाऱ्यांकडून राणेंच्या बंगल्याची पहाणी करण्यात आली. दरम्यान यानंतर नारायण राणे यांच्याकडून उदय सामंत (Uday Sammat) आणि शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे. राणे यांच्या आरोपांना उदय सामंत यांनी देखील प्रत्युत्तर दिले. मी कोणाच्याही घराची चौकशी लावली नाही. मला तसले प्रकार जमत देखील नाहीत. मी निवडणुकांच्या मौदानात उत्तर देणारा कार्यकर्ता आहे. मी राणे यांच्या घराची चौकशी लावण्यासाठी काही केले असेल, किंवा साधा फोन जरी केला असेल तर मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

मी कोणाच्याही घराची चौकशी लावली नाही, मी जर यासाठी काही केले असेल किंवा साधा फोन जरी केला असेल तर मी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार आहे. मी कोणाचेही घर पाडण्याचे पाप करत नाही. मी असले राजकारण करत नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातूनच उत्तर देतो. कोणाचे मजले सहा आहेत की सात याचे मला काहीही देणे -घेणे नाही. कोणाचे घर किती मोठे आहे हे मी कधी मोजले नाही. त्यामुळे मी कोणाच्या घराची चौकशी लावली नाही आणि कोणाला पाठिशी देखील घालणार नसल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.

ईडीवरून नारायण राणेंना टोला

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी ईडीच्या चौकशीवरून देखील भाजपावर निशाणा साधला आहे. ईडीची रेड कोणत्या नेत्याच्या घरावर पडणार आहे, ती कधी पडणार आहे? हे जर केंद्रातील मंत्र्यांना कळत असेल तर ईडीचा कारभार कसा चालतो याबाबत काय बोलणार असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. कोणी जर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले तर मी त्याला प्रत्युत्तर देत बसणार नाही. कारण मला उगच कोणाला मोठे करायचे नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी नारायण राणे यांना लगावला आहे.

संबंधित बातम्या

ठरलं! एकमेकांच्या विरोधात जायचं नाही, बोलायचं नाही, ठाणे, केडीएमसी, पालघरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी होणार?

Modi | अफगाण पगडी घालून मोदींची अफगणिस्तानातील शीख आणि हिंदू शिष्टमंडळासोबत चर्चा

VIDEO: जलतरण तलावाच्या लोकार्पणावरून शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने; नेते मात्र हास्यविनोदात रमले

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.