AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाखले मागणाऱ्यांनी शिकवू नये, शिवराय मोठे की बाळासाहेब ठाकरे हे सांगा : उदयनराजे भोसले

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर सडकून टीका करत एक प्रश्न उपस्थित केला आहे (Udayanraje Bhosale question Shivsena).

दाखले मागणाऱ्यांनी शिकवू नये, शिवराय मोठे की बाळासाहेब ठाकरे हे सांगा : उदयनराजे भोसले
| Updated on: Jul 23, 2020 | 2:40 PM
Share

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर सडकून टीका करत एक प्रश्न उपस्थित केला आहे (Udayanraje Bhosale question Shivsena). आम्ही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील आहोत की नाही हे विचारत दाखले मागणाऱ्यांनी शिकवू नये. त्यांनी आधी बाळासाहेब ठाकरे मोठे की छत्रपती शिवाजी महाराज हे सांगावं, असं मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

उदयनराजे भोसले म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पुढेही राहणार आहेत. पण माझा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न आहे, की शिवाजी महाराज मोठे आहेत की बाळासाहेब ठाकरे? हा प्रश्न मला सर्वांनाच विचारायचा आहे. शिवसेना भवनावर महाराजांची प्रतिमा वर पाहिजे आणि मग खाली बाळासाहेब ठाकरे यांची पाहिजे. मग यावर कुणीच आजपर्यंत का आक्षेप घेतला नाही? यावर का कुणी विचारणा केली नाही. जर बाळासाहेब ठाकरे शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असतील तर त्यांनी शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करावं. मी हे द्वेषापोटी म्हणत नसून तार्किक मुद्दा मांडत आहे. त्यामुळे माध्यमांनी जसा मला प्रश्न विचारताय तसा त्यांनाही विचारावा.”

“आम्ही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील आहोत की नाही याचे ज्यांनी दाखले मागितले त्यांनी असं बोलणं हास्यास्पद आहे. शिवसेना हा महाराजांच्या नावावर आधारीत पक्ष आहे. मागीलवेळी जितेंद्र आव्हाड आणि इतरांनी वक्तव्ये केली तेव्हा आम्ही शांत बसलो. मात्र, जेव्हा त्यांनी आम्ही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातीलच नाही असं म्हटलं त्यावेळी त्यांनी मला खूप डिवचलं. त्यामुळे मला पत्रकार परिषद घेणं भाग पडलं,” असं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं.

महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता : उदयनराजे भोसले

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही” अशा शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीनंतर काही घडलेच नसल्याचा दावा केला. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने खासदार उदयनराजे यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्याचे काल समोर आले होते. (Udayanraje Bhosale on Jai Bhavani Jai Shivaji Slogans)

सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला घेतला, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

Udayanraje Rajyasabha MP Oath | इंग्रजीतून शपथ घेऊन उदयनराजे म्हणाले, जय भवानी, जय शिवाजी, सभापतींकडून समज

Jai Bhavani Jai Shivaji | छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान, भाजपचं तोंड बंद का? : संजय राऊत

Jai Bhavani Jai Shivaji | व्यंकय्या नायडूंविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक, ब्राह्मण महासंघाकडून माफीची मागणी

Udayanraje Bhosale question Shivsena

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.