मराठा आरक्षणावर योग्यवेळी सपाटून बोलणार; उदयनराजेंचा सूचक इशारा

| Updated on: Nov 23, 2020 | 2:52 PM

मराठा आरक्षणावर राज्य सरकार काय करत आहे हे मी पाहतोय. सरकारच्या भूमिकेवर योग्यवेळी मी सपाटून बोलणार आहे, असा सूचक इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. (Udayanraje Bhosale statement on Maratha reservation)

मराठा आरक्षणावर योग्यवेळी सपाटून बोलणार; उदयनराजेंचा सूचक इशारा
Follow us on

सिंधुदुर्ग: मराठा आरक्षणावर राज्य सरकार काय करत आहे हे मी पाहतोय. सरकारच्या भूमिकेवर योग्यवेळी मी सपाटून बोलणार आहे, असा सूचक इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. (Udayanraje Bhosale statement on Maratha reservation)

गोव्याचा दोन दिवसाचा दौरा आटोपून साताऱ्यात जात असताना उदयनराजे भोसले आज बांद्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष राजाराम सावंत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बांदा मराठा समाज मंडळाच्यावतीने त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यत आलं. माजी सरपंच सावळाराम सावंत यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर राजाराम सावंत आणि उदयनराजे यांच्यात अर्धातास चर्चा झाली.

यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हा इशारा दिला. मी फक्त योग्यवेळेची वाट पाहत आहे. योग्यवेळ येताच मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजे पुन्हा आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, बांदा मराठा समाज मंडळाचे कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असे वक्तव्य उदयनराजे यांनी नुकतेच केले होते. तसेच आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला होता. वेळ आल्यावर मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन. मात्र, राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले होते. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा रोख राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिशेने होता. (Udayanraje Bhosale statement on Maratha reservation)

सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळायला पाहिजे, या भूमिकेवर आपण अजूनही ठाम असल्याचे सांगतानाच योग्यवेळी मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन, असेही त्यांनी म्हटले होते. (Udayanraje Bhosale statement on Maratha reservation)

 

संबंधित बातम्या:

वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन: उदयनराजे भोसले

मराठा आरक्षण समितीवरून चव्हाणांना हटवून एकनाथ शिंदेंना अध्यक्ष करा; नरेंद्र पाटील यांची मागणी

मराठा आरक्षणावर आता तुम्हीच मार्ग काढा; मराठा आंदोलक शरद पवारांना भेटणार

(Udayanraje Bhosale statement on Maratha reservation)