क्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावेल : उदयनराजे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे (Udayanraje Bhosale warn on Maratha Reservation).

क्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावेल : उदयनराजे
Follow us
| Updated on: Sep 18, 2020 | 5:22 PM

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे (Udayanraje Bhosale warn on Maratha Reservation). आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजात प्रचंड खदखद आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा प्रश्न सुटला नाही तर 1857 प्रमाणे क्रांती होईल आणि लोक नेत्यांना मारुन टाकतील, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. तसेच मागील मोर्चे शांततेत निघाले, मात्र आता जे मोर्चे निघतील ते शांततेत निघणार नाही, असंही ते म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत बोलत होते.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “मराठा आरक्षणाला स्थगिती का मिळाली या तपशीलात मला जायचं नाही. पण कुठल्याही समाजावर अन्याय होता कामा नये. समाज म्हटलं की वेगवेगळ्या जातीजमातीची लोकं असतात. मराठा समाजावर का अन्याय होतोय? उद्या लोक प्रश्न विचारायचं सोडून देतील आणि काय करतील मला सांगता येत नाही. मागे जे मार्चे निघाले ते शांततेत निघाले, आता जे मोर्चे निघाले ते शांततेत निघणार नाही. त्याचा परिणाम स्वतःला फार मोठा पक्ष समजणाऱ्या पक्षांना समजेल. लोक काय करतील मी सांगू शकत नाही.”

“मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर मराठा समाज या सर्व नेत्यांना बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर लावून टाकेल. लोकांमध्ये प्रचंड खदखद आहे. त्यामुळे 1857 प्रमाणेच राज्यात क्रांती होईल आणि लोकं सर्वांना मारुन टाकतील. नेतृत्व कुणाचंही असो, विचार महत्त्वाचा आहे. सर्व देवांची शपथ घेऊन सांगतो आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर अनर्थ होईल, कुणीही थांबवू शकणार नाही,” असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला.

“मी काही सांगकाम्या नाही, कुणीही सांगायचं आणि मी ऐकायचं”

उदयनराजे भोसले म्हणाले, “शरद पवार वयाने ज्येष्ठ आहेत आणि आदरणीय आहेत. माझ्याआधी शरद पवार जन्माला आलेत, मी त्यांच्या मुलासारखा आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेवर मला भाष्य करायचं नाही. मी काही सांगकाम्या नाही, कुणीही सांगायचं आणि मी ऐकायचं. अशी माझी आणि माझ्या घराण्याची ख्यातीही नाही. कोर्ट वगैरे ठिक आहे, त्यांचा अवमान करत नाही पण तेही माणसं आहेत, त्यांनीही विचार करायला पाहिजे. शरद पवार राजकारणातील सर्वात ज्येष्ठ आहेत. मराठा आरक्षणावर त्यांनाच प्रश्न विचारले पाहिजेत.”

“माझ्यासह कुणालाही विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ करण्याचा अधिकार नाही”

उदयनराजे भोसले मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासावरही आक्रमक झाले. ते म्हणाले, “मला वाटतं तोडगा काढण्याची वेळ आता संपली आहे. ज्यांना आरक्षण द्यावं वाटत होतं ते मागेच द्यायला हवं होतं, नाहीतर परिणामांना सामोरं जावं. परिणाम काय होतील हे पदांवर असणाऱ्यांना विचारा. कुठल्याही पक्षाचे आमदार, खासदार असो त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी का लावला नाही. लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. या प्रश्नावर मला संताप येतोय. जर मला संताप येत असेल, तर ज्या विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न आहे त्यांना किती संताप येत असेल. माझ्यासह कुणालाही विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ करण्याचा अधिकार दिलेला नाही. आता त्यांच्या आयुष्याचं काय होणार यावर विचार केलाय का? बस झालं हे कायदे-बियदे. खड्ड्यात गेले सगळे कायदे.”

“प्रकाश आंबेडकर बरोबर बोलले”

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावरुन मराठा समाजातील काही नेत्यांच्याच मनात आरक्षण मिळू नये असल्याचा आरोप केलाय. त्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, “प्रकाश आंबेडकर बरोबर बोलले आहेत. राष्ट्रवादी-काँग्रेसमधील मराठा समाजातील काही नेत्यांनाच मराठा आरक्षण नको आहे. त्यांना आपल्या हातातील नेतृत्व गरिब मराठा समाजाच्या हातात जाईल अशी भीती आहे. या लोकांना जनाची नाही किमान मनाची लाज असेल तर त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.”

“देवेंद्र माझा खास मित्र, त्याचं बिचाऱ्याचं काय चुकलं”

“पंतप्रधान, मुख्यमंत्री हे पदं असतात. हे पदं लोकांनी निर्माण केले, त्यांनी तुम्हाला निवडून दिलं आहे. देवेंद्र माझा खास मित्र आहे, त्याचं बिचाऱ्याचं काय चुकलं? त्याचं नाव पाटील, जाधव असतं तर कुणीच काही बोललं नसतं. या प्रकरणात ब्राह्मण असल्याचा संबंधच काय? जाता जाता जात नाही त्याला जात म्हणतात. लोकशाही लोकं मतदानाचा हक्क बजावत नाही, तर ते जातीला मतं देतात. त्यामुळेच चांगले लोकं लांब राहिलेत,” असंही उदयनराजे म्हणाले.

संबंधित बातम्या :

सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं, उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, विनायक मेटेंची विनंती

संबंधित व्हिडीओ :

Udayanraje Bhosale warn on Maratha Reservation

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.