AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushma Andhare : ‘टांगे आगे बढाने के लिए होती है, किसी के…’, चित्रा वाघ यांच्याविषयी सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

Sushma Andhare : दिशा सालियान प्रकरणावरुन सभागृहात बोलताना आमदार चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी झाली होती. यावेळी चित्रा वाघ यांनी, परब यांना, मी तुमच्या सारखे 56 पायाला बांधून फिरते, असं म्हंटलं होतं.

Sushma Andhare : 'टांगे आगे बढाने के लिए होती है, किसी के...', चित्रा वाघ यांच्याविषयी सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
sushma andhare chitra wagh
| Updated on: Mar 26, 2025 | 1:30 PM
Share

“कुणाल कामराचा स्टुडिओ तोडण्याचा अधिकार कोणाला आहे?. तुम्ही स्टुडिओ तोडताय तुम्ही सरकार पक्षात आहात याचा विसर पडलाय का?” असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारलाय. “गद्दार ही टर्म लोकांच्या डोक्यातून जावी म्हणून आपण धर्मवीर चित्रपट काढून करोडो रुपये खर्च केले. त्या सगळ्या खर्चावर कुणाल कामराच्या एका कवितेने पाणी फिरलं. कुणाल कामराचा विषय भाजपने ठरवून मोठा केला. शिंदे साहेब याचा विचार करा” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. “ज्या सभागृहात एका सेकंदाला 6400 खर्च होतो, त्या सभागृहात महाराष्ट्राच्या हिताच्या काय चर्चा झाल्या?. फडणवीस यांनी सभागृहाचा सन्मान करायला त्यांच्या सदस्यांना शिकवावं. एक सदस्य थिल्लरपणा दाखवतात त्याच्यावर तुम्ही चकार शब्द बोलणार नाही” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

दिशा सालियान प्रकरणावरुन सभागृहात बोलताना आमदार चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी झाली होती. यावेळी चित्रा वाघ यांनी, परब यांना, मी तुमच्या सारखे 56 पायाला बांधून फिरते, असं म्हंटलं होतं. त्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चित्रा वाघ यांच्यावर बरीच टीका केली. आता सुषमा अंधारे यांनी पुन्हा चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. “टांगे आगे बढाने के लिए होती है, किसी के काम मे अडाने के लिए नही होती” असं सुषमा अंधारे चित्रा वाघ यांच्याबद्दल बोलल्या आहेत. “त्या बाईचा मेंदूच तेवढा आहे. शील, चारित्र्य, इमान हे शब्द उच्चारण्याची ज्यांची लायकी नाही. त्यांची लायकी संबंध महाराष्ट्राने ठरवून टाकली आहे” अशा शब्दात चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.

‘वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर काय म्हणाल्या?’

“भारतीय जनता पार्टीला विरोधकांचा विरोध सहन होत नाही. कधी कधी माझ्या मनात विचार येतो की आत्ता जी माणसं बोलतात, त्यांना प्रत्युत्तर द्यायला आपण सभागृहात असलं पाहिजे होतं” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर चर्चा करून जाणीवपूर्वक लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय असं त्या म्हणाल्या.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.