योग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची ‘गुपचिळी’

छगन भुजबळ शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे नाशिक शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. नाशिकचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, आमदार, खासदार भुजबळांच्या सेनाप्रवेशाला विरोध करण्यासाठी 'मातोश्री'वर आले होते.

योग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'
Follow us
| Updated on: Aug 25, 2019 | 11:57 AM

मुंबई : कोणे एके काळी शिवसेनेतून (Shivsena) राष्ट्रवादीत (NCP) गेलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सेनेत घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मात्र भुजबळांना शिवबंधन बांधण्याच्या चर्चांवर अळीमिळी गुपचिळी बाळगली आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेईन, असं मोघम उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.

छगन भुजबळ शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे नाशिक शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. नाशिकचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, आमदार, खासदार भुजबळांच्या सेनाप्रवेशाला विरोध करण्यासाठी ‘मातोश्री’वर आले होते.

शिवसेनेचे माजी आमदार बबनराव घोलप, तालुकाध्यक्ष, जिल्हाप्रमुख यांनी आपला भुजबळांना विरोध असल्याचं मत या भेटीत उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त केलं. आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे, असं नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकारी आणि खासदारांना निश्चिंत राहण्याचं आश्वासन दिलं. मात्र त्याचवेळी ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेईन’ असे अस्पष्ट संकेत देत भुजबळांच्या सेनाप्रवेशाचा प्रश्न अनुत्तरित ठेवला आहे.

यापूर्वीही “वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल”, अशी सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

भुजबळ स्वगृही परतणार का, उद्धव ठाकरे म्हणतात, “वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल”

भुजबळांना प्रवेश देऊ नये असं म्हणणारा शिवसेनेतला गट सक्रिय झाल्यामुळे भुजबळांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयावर खलबतं सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र भुजबळांनी या वृत्तांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं. ‘तो दुसराच कोणीतरी छगन भुजबळ असेल’ असं म्हणत भुजबळ ‘तो मी नव्हेच’ या भूमिकेत शिरले.

28 वर्षांपूर्वी भुजबळांनी शिवसेना सोडली

छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतूनच सुरु झाली. 1947 ला जन्मलेल्या भुजबळांनी 1960 च्या दशकात शिवसेनेतून कामाला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेच्या विचारशैलीमुळे तरुण वयात भुजबळ शिवसेनेत दाखल झाले.

छगन भुजबळ 1973 मध्ये शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत निवडून गेले. 1973 ते 1984 दरम्यान भुजबळांनी महापालिकेत दमदार काम केल्यानंतर ते मुंबईचे महापौर बनले.

1985 मध्ये भुजबळ माझगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. 1990 मध्ये ते पुन्हा निवडून आले.  मात्र 1991 मध्ये शिवसेनेतील मतभेदानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसचा हात पकडला.

भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर भुजबळ शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.