एक जरी निष्ठावंत म्हणाला गेट आऊट तर मी पायऱ्या उतरून निघून जाईल; असं का म्हणाले उद्धव ठाकरे?

ज्यांना दिलं नाही. ते माझ्यासोबत आहेत. हे माझं नशीब आहे. ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाही. तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसेनेची आहे.

एक जरी निष्ठावंत म्हणाला गेट आऊट तर मी पायऱ्या उतरून निघून जाईल; असं का म्हणाले उद्धव ठाकरे?
...तर मी पायऱ्या उतरून निघून जाईलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 8:53 PM

मुंबई : शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटातील वाद चांगलाच रंगला होता. मात्र अखेर ठाकरे गटाने यात बाजी मारली. यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज हा दसरा मेळावा शिवतीर्थावर (Dussehra Melava at Shivtirtha) पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना शिंदे गटावर (Shinde Group) चांगलाच निशाणा साधला. एक जरी निष्ठावंत गेट आऊट म्हणाला तर मी पायऱ्या उतरुन जाईल, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

…तर मी पायऱ्या उतरुन जाईल

ज्यांना दिलं नाही. ते माझ्यासोबत आहेत. हे माझं नशीब आहे. ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाही. तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसेनेची आहे. जोपर्यंत सोबत आहात. तोपर्यंत मी पक्षप्रमुख. एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलेल गेट आऊट तर मी पायऱ्या उतरून जाईल.

हे सुद्धा वाचा

भाजपने वार केला म्हणून मी महाविकास आघाडी केली

हे तुम्ही सांगावं गद्दारींनी नाही. काय कमी केलं त्यांना. बाप मंत्री, कार्ट खासदार, कुणाचं आमदार. हे डोळे लावून बसलेत. नातू नगरसेवक. सर्व काही एकच. माझ्याचकडे पाहिजे. मी का मुख्यमंत्री झालो. का केली आघाडी, ही लपून ठेवण्याची गोष्ट नाही. भाजपने पाठीत वार केला. म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली.

मी हिंदुत्व सोडलं असेल. तुम्ही सांगा मी हिंदुत्व सोडलं. सोडलं मी हिंदुत्व. जेव्हा मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सात जणांत त्याचाही मान राखला. तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीवाले मांडीला मांडी लावून बसलेत दिसलं नव्हतं का ? की स्वत:ची दाढी स्वत:च्या तोंडात गेली होती.

का बोलला नाही तेव्हा? अमित शहांसोबत ठरलं होतं. पण त्यांनी नकार दिला. मी शिवरायांच्या साक्षीने माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो. जे मी बोललो तसंच घडलं होतं.

ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा

माझी बोटं हलत नव्हती. शरीर निश्चल पडलं होतं. ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा. कट करणारे अप्पा म्हणजे कटाप्पा. हे कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. आपल्यासमोर येऊच शकणार नाही. हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे त्यांना माहीत नाही.

ही धमकी नाही तेजाचा शाप

आई जगदंबेने मला जी शक्ती दिली. त्याच्याशी तुम्ही पंगा घेतला. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, एक तेजाचा शाप असतो. हा सर्व तेजाचा शाप आहे. विचित्र गोष्ट अशी की ज्यांना आपण सर्व काही दिलं. मंत्रीपद, आमदार, खासदारकी ज्यांना दिली ते नाराज होऊन गेले.

आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की…

भाजप-सेनेचा अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं. हे आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो. आज तुम्ही केलं, तेच मी सांगत होतो. अडीच वर्ष तुमची, अडीच वर्ष आमची. तेव्हा म्हणत होतात हे संभव नही. तेव्हा का सन्मानाने केलं नाही, असा खडा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.