शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्या; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर जबरदस्त पलटवार

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta-Foxconn Joint Venture) प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात आहे.

शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्या; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर जबरदस्त पलटवार
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 4:42 PM

मुंबई : वेदांता प्रोजेक्ट गुजरातला जाण्यास तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच(Uddhav Thackeray) जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar )यांनी केला होता. वेदांचा प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्या असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta-Foxconn Joint Venture)गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात आहे.

शिंदे गटातील नेत्यांकडून शिवसेनेवर गंभीर आरोप केले जात आहेत. विशेषत: शिंदे गटातील नेते थेट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना टार्गेट करत आहेत. त्यांच्या या आरोपांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वेदांता प्रकल्प राज्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. शिवसेना फोडायचा काही जण प्रयत्न करीत आहेत. शिवसेना फोडण्या आधी इतिहास जाणून घ्यावा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. शिवसेनेची सहावी पिढी मैदानात उतरलेली आहे असंही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

माझ्या समोर बसलेला हा शिवसैनिक धगधगत्या मशालीसारखाआता मैदानात उतरला आहे. फॉक्सकॉन प्रकल्प आणण्यासाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केले. पण आता तो गेल्यानंतर आताचं सरकार त्या अपयशाचे खापर जाणीवपूर्वक आपल्यावर फोडत आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

काय म्हणाले होते केसरकर?

दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. मी स्वतः उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं, भेटून विनंती केली होती. या प्रोजेक्ट साठी,उद्योगसमूह चेअरमन अनिल अग्रवाल यांना उद्धव ठाकरे यांची भेट हवी होती. मात्र,उद्धव ठाकरे यांनी त्यांना वेळही दिला नाही असा आरोप दीपक केसरकर यांनी केला.

कोणत्याही उद्योगपतीची पहिली पसंती महाराष्ट्र असते मात्र गेल्या सरकारच्या अस्थिर राजकारणानं, हा उद्योग महाराष्ट्राबाहेर गेला. मराठी माणसांच्या नोकऱ्या जाण्यास यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे केसरकर म्हणाले होते.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.