तेजससोबत फोटोसाठी आग्रह, उद्धव म्हणाले, मला स्टुलावर उभं राहावं लागतं!
या सभेसाठी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने कणकवलीत आले. यावेळी त्यांचे चिरंजीव तेजस ठाकरेही हे सुद्धा सोबत होते. हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तेजसच्या उंचीवरुन मिश्किल विनोद केला.
सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav and Tejas Thackeray) हे प्रचारसभेनिमित्त आज कोकणात आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपमध्ये दाखल झालेले खासदार नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरे (Uddhav and Tejas Thackeray) यांची सभा आहे. कणकवली (Uddhav Thackeray Kankavli rally) मतदारसंघात भाजपकडून नितेश राणे विरुद्ध शिवसेनेकडून सतीश सावंत यांच्यात लढत होत आहे. सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची आज कणकवलीत सभा होत आहे.
या सभेसाठी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने कणकवलीत आले. यावेळी त्यांचे चिरंजीव तेजस ठाकरेही हे सुद्धा सोबत होते. हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तेजसच्या उंचीवरुन मिश्किल विनोद केला.
प्रसारमाध्यमांनी कॅमेरा पोजसाठी उद्धव ठाकरेंना तेजसबरोबर उभं राहण्याची विनंती केली. उद्धव ठाकरेंनी ती मान्यही केली, पण तेजसच्या बाजूला उभं राहताना ते गमतीने म्हणाले, याच्याबरोबर उभं राहताना मला स्टुलावर उभं राहावं लागतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तेजसच्या खांद्यावर हात ठेवला आणि पोज दिली.
VIDEO :
जाहीर सभांपूर्वी बैठक
सिंधुदुर्गातील जाहीर सभांच्या आधी उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी बैठकीत शिवसेना नेते सुभाष देसाई, संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे हॉटेल गंगाईमध्ये विश्रांतीसाठी थांबले. तिथे उद्धव ठाकरेंसाठी राखीव असलेल्या विशेष कक्षात सर्व नेते उपस्थित होते.