ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर, शिवसेनेकडे तगडी खाती, एकट्या एकनाथ शिंदेंकडे 10 मंत्रालये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे गृह आणि नगरविकास ही दोन्ही महत्त्वाची खाती शिवसेनेकडे आली आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप (Thackeray government Portfolio allocatio) जाहीर झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे गृह आणि नगरविकास ही दोन्ही महत्त्वाची खाती शिवसेनेकडे (Thackeray government Portfolio allocatio) आली आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नगरविकास खातं असेल. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास आणि जलसंपदा खातं असेल. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल आणि ऊर्जा मंत्रालय असेल. सध्याच्या फॉर्म्युल्यावरुन शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आणि 22 अशी एकूण 23 खाती, काँग्रेसकडे 12 आणि राष्ट्रवादीकडे 13 खाती आहेत. राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद आल्यास त्यांच्या खात्यातही 14 मंत्रिपदे येऊ शकतात.
मागील दोन दिवसांपासून गृह खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिलं अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवलं आहे.
शिवसेनेकडील महत्त्वाची खाती – मुख्यमंत्री, गृह, नगरविकास, उद्योग, कृषी, क्रीडा आणि परिवहन, सार्वजनिक बांधकाम
राष्ट्रवादीकडील महत्त्वाची खाती – अर्थ, गृहनिर्माण,राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा
काँग्रेसकडील महत्त्वाची खाती – महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण,
एकनाथ शिंदे (10) गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
सुभाष देसाई (12) उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.
छगन भुजबळ (06)
ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.
जयंत पाटील (07)
वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.
बाळासाहेब थोरात (06) महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.
नितीन राऊत (6)
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.
मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर?
दरम्यान, हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनुत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे अधिवेशनात महाविकासआघाडीचे केवळ सहा मंत्रीच दिसतील. 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यानंतर डिसेंबरअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार (Thackeray Government Ministry) होण्याची शक्यता आहे.