‘पेढे कोण कुणाला भरवतोय ते कळेलच’, विधान परिषद निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य

Maharashtra Legislative Council Election : पुढच्या महिन्यात विधान परिषद निवडणूक होणार आहे. त्याची रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण 11 जागा आहेत. उद्धव ठाकरे आज विधान भवनात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधान परिषदेबद्दल सूचक वक्तव्य केलं.

'पेढे कोण कुणाला भरवतोय ते कळेलच', विधान परिषद निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 1:58 PM

“विधान परिषद निवडणुकी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. 16 मते आहेत. 11 जागा आहेत. शिवसेनेचा एक येऊ शकतो. एनसीपीने नीट गणित मांडलं तर त्यांचा एक येऊ शकतो. काँग्रेसचा एक येऊ शकतो. शेकापचे एक येऊ शकतो. जयंत पाटील यांना एनसीपी तिकीट देत असेल तर त्यांचाही येईल. आमचं गणित पक्क आहे. 11 जागेत आमच्या तीन पक्षाच्या तीन येतात. आम्ही एक-एकाची खात्री देत आहोत. त्यामुळे त्यांची मते त्यांना संभाळायची आहेत. कारण लोकसभा निवडणुकीनंतर बऱ्याच हालचाली झाल्या आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“विधान परिषदेची निवडणूक झाली तर गंमतीशीर होणार. पेढे कोण कुणाला भरवतोय ते कळेलच” असं उद्धव ठाकरे म्हणाले. विधान परिषदेचे 11 सदस्य पुढच्या महिन्यात निवृत्त होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम मागच्या आठवड्यात जाहीर झाला. विधान परिषदेवर आता सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते? याची उत्सुक्ता आहे.

मतदान किती तारखेला?

विधानसभा सदस्य विधान परिषदेतील आमदारांची निवड करणार आहेत. 25 जून पासून 2 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. पाच जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. 12 जुलै रोजी रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे. 12 जुलै रोजीच होणार पाच वाजल्यानंतर मतमोजणी सुरुवात होईल.

निवृत्त होणारे सदस्य कोण?

सध्या विधान परिषदेवर असणारे 11 सदस्य पुढच्या महिन्यात 27 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. डॉ. मनिषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्लाह दुरानी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत प्रभाकर पाटील विधान परिषदेतील या 11 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.