Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : भुजबळ, राणे, राज ठाकरे आता एकनाथ शिंदे, वारंवार शिवसेनेसोबतच विश्वासघाताचं राजकारण का? उद्धव ठकरे म्हणतात…

या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना खोचक टोले लगावले आहेत. तसेच त्यांच्या बोलण्यात एक संतापही जाणवतो आहे. 

Uddhav Thackeray : भुजबळ, राणे, राज ठाकरे आता एकनाथ शिंदे, वारंवार शिवसेनेसोबतच विश्वासघाताचं राजकारण का? उद्धव ठकरे म्हणतात...
भुजबळ, राणे, राज ठाकरे आता एकनाथ शिंदे, वारंवार शिवसेनेसोबतच विश्वासघाताचं राजकारण का? उद्धव ठकरे म्हणतात...Image Credit source: saamana
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 7:18 AM

मुंबई : गेल्या काही दशकातली शिवसेनेची वाटचाल पाहिल्यास शिवसेनेच्या पावलोपावली फुटीचं राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वात आधी छगन भुजबळ, त्यानंतर नारायण राणे, त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray), गणेश नाईक आणि आता एकनाथ शिंदे यांनी राजकारणात आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे सहाजिकच वारंवार हे फुटीचं आणि विश्वासघाताचं राजकारण शिवसेनेसोबतच का?  असा प्रश्न सामानासाठी घेतलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना केला (Sanjay Raut Uddhav Thackeray Interview). इतर प्रश्नांची जशी उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणाने उत्तर दिली, तसेच त्यांनी याही प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना खोचक टोले लगावले आहेत. तसेच त्यांच्या बोलण्यात एक संतापही जाणवतो आहे.

शिवसेनेतच फूट का पडते?

या प्रश्नाला उत्तर देतान ठाकरे म्हणातात, शेवटी आम्ही पक्ष हा प्रोफेशनली चालवत नाही, असं मी म्हणेन. तुम्हीही गेले अनेक वर्ष शिवसेना अनुभवत आहात. आम्ही शिवसेना एक परिवार म्हणून बघत आलोय. बाळासाहेबांनी आम्हाला तेच शिकवलं की एकदा आपलं म्हटलं की ते आपलंच, एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही त्याच्यावर अंधविश्वास टाकतो. त्याला ताकद देण्यापासून पूर्ण जबाबदारी ही त्याच्यावरती टाकतो, असे उद्धव ठाकरे यांनी फुटीचं कारणं सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

हिंदूत्वावरून टोलेबाजीत

तसेच त्यांनी हिंदूत्वावरूनही टोलेबाजी केली आहे. जे आत्ता आम्ही हिंदुत्व सोडला अशी बोंब उडवत आहेत, त्यांना आम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की तेव्हा आम्ही हिंदूत्व सोडलं नव्हतं, तेव्हा भाजपने युती तोडली. तेव्हाही अनेकांना वाटलं होतं की शिवसेना आता संपेल, पण शिवसेना एकाकी लढली आणि 63 आमदार शिवसेनेचे निवडून आले. त्या काळात विरोधी पक्षाची जबाबदारी जी आपल्यावर आली तेव्हा विरोधी पक्षनेते पद हे कोणाला दिलं होतं? हे ही आठवा, असे ठाकरे म्हणाले.

बोलून सर्व काही झालं असतं

तर भाजपने आत्ता जे केलं ते तेव्हा बोलणी केल्याप्रमाणे केलं असतं, तर ते सन्मानाने झालं असतं. देशभरात पर्यटन करण्याची गरज लागली नसती. हजारो कोटी रुपये खर्च केले केले असे मी ऐकलं. विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च, त्याच्यानंतर काही अतिरिक्त खर्च म्हणजे खोक्यातला खर्च, खोक्यात काय दडलय? ते देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला माहित. पण हे फुकटात झालं असतं आणि सन्मानाने झाला असतं, असेही ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावलं आहे.

भाजपला आधीच मुख्यमंत्रिपद मिळालं असतं

तसेच हे घडवण्यामागे एकच उद्देश होता, त्यांना शिवसेना संपवायची आहे. जे शिवसेनेसोबत ठरवलं होतं, अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पद तेच तर तुम्ही आता केलं, ते तेव्हाच केलं असतं तर निदान पाच वर्षात भाजपला एकदा तरी अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.