Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रक्तात शिवसेना असलेले अनिल भैया गेल्यानं धक्का बसला’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेनेचे अहमदनगरचे माजी आमदार अनिल राठोड आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे (Uddhav Thackeray on Anil Rathod).

'रक्तात शिवसेना असलेले अनिल भैया गेल्यानं धक्का बसला' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 05, 2020 | 1:26 PM

मुंबई : शिवसेनेचे अहमदनगरचे माजी आमदार अनिल राठोड आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे (Uddhav Thackeray on Anil Rathod). अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबवला, अशा भावपूर्ण शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना आदरांजली दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैया यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. कोरोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत होता. असं असतांनाच अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हा आमच्या शिवसेना परिवारावर मोठा आघात आहे. तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“युती सरकारच्या काळात मंत्रीमंडळात असलेले अनिल राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. रस्त्यावर स्वत: उतरुन लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना नगर जिल्ह्यात अक्षरश: रुजवली. लोकांसाठी आंदोलने केली, त्यांच्या समस्यांची तड लावली. नगर शहरात तर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आणि ते यशस्वी करुन दाखवले,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक गमावला’

“नगर जिल्ह्यातून 25 वर्षे सतत आमदार म्हणून निवडून येत असले, तरी त्यांची ओळख रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ता अशी सांगण्यात त्यांना अभिमान होता. कुठलाही अहंकार नसलेला आणि आपला जन्मच मुळी लोकांसाठी झालेला आहे असे समजणाऱ्या अनिल भैया यांच्या जाण्याने आम्ही शिवसेनेतील आमच्या अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिकाला गमावलं आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

‘दोन पिढ्यांना जोडणारे, मार्गदर्शक नेतृत्व हरपले’

उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनावरही शोक व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विकास वाटचालीत योगदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत त्यांनी आदरांजली वाहिली.

हेही वाचा : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन

उद्धव ठाकरे म्हणाले, “स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणाऱ्या नेतृत्वात ज्येष्ठ नेते निलंगेकर यांचा समावेश होता. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. ते मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी नेहमी आग्रही होते. शिवाजीराव पाटील यांनी तितक्याच तडफेने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. निष्ठावंत राजकीय विचारसरणीच्या पाटील यांच्या निधनामुळे दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

अनिल भैया गेले हा मोठा आघात, लोकांसाठी जगलेला नेता गेला : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अनिल राठोड यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, “माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना.”

हेही वाचा :

Anil Rathod | सलग 25 वर्ष आमदारकी, शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

Shivajirao Patil Nilangekar | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.