‘नेपाळी औलाद 2-3 महिने थांब तुला…’ ठाकरे गटाच्या नेत्याने नितेश राणेंबद्दल वापरले नको ते शब्द
ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. अत्यंत खालच्या शब्दात आसूड ओढले आहेत. नितेश राणे महाविकास आघाडीतील नेत्यांवर खासकरुन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर ज्या भाषेत टीका करतात, आता ठाकरे गटाने सुद्धा त्याच भाषेत उत्तर दिलं आहे.

कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे महाविकास आघाडीतील नेत्यांवर खासकरुन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर सतत बोचरी टीका करतात. ठाकरे गटाकडून त्यांना त्याच भाषेत उपनेते शरद कोळी उत्तर देतात. आता आमदार नितेश राणे यांच्यावर शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे. नितेश राणे म्हणजे भाजपचं पाळलेलं गटारीतील डुक्कर आहे अशा शब्दात टीका केली.
“भाजपने नितेश राणे या डुकराला राज्यात कमळ फुलवण्यासाठी सोडलं होतं. मात्र त्याने या राज्यात चिखल करून ठेवला. नेपाळी औलाद 2-3 महिने थांब, तुला बोऱ्या बिस्तर बांधून नेपाळला पाठवल्याशिवाय राहणार नाही” असं शरद कोळी म्हणाले.
‘तुम्ही भाजपच्या गटारीतील डुक्कर’
“भाजपने तुम्हाला लोकसभेच्या प्रचारात कुठे घेतलं नाही. कारण तुम्ही गटारीतले डुक्कर आहात. नितेश राणेंसह बापाला आणि भावाला महाराष्ट्र भाजपने लोकसभा प्रचारात कुठेही घेतले नाही. कारण तुम्ही भाजपच्या गटारीतील डुक्कर आहात. नेपाळी औलाद 2-3 महिने थांब तुला बोऱ्या बिस्तर बांधून नेपाळला पाठवल्याशिवाय राहणार नाही” अशी खाल्याच्या पातळीची भाषा शरद कोळी यांनी वापरली.