पवार साहेब आणि सोनियाजींनी मदत केली म्हणत उद्धव ठाकरेंनी कातरत्या आवाजात मुख्यपंत्री पदाचा राजीनामा दिला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कॅबिनेटची बैठक पार पडली. ही मंत्रिमंडळाची शेवटची ठरली. या बैठकीत शिवसेनेकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. राष्ट्रावादी आणि काँग्रेसने साथ दिली. यांनतर हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला.
मुंबई : मंत्रालयात पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर शिवसेना(shivsena) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला. पवार साहेब आणि सोनियाजींनी मदत केली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray ) कातरत्या आवाजात त्यांचे आभार मानले आणि मुख्यपंत्री पदाचा राजीनामा दिला. ज्यांना मी आपलं म्हणत होतो ते सोडून गेले. राष्ट्रावादी आणि काँग्रेसच्या सहकार्यामुळेच औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कॅबिनेटची बैठक पार पडली. ही मंत्रिमंडळाची शेवटची ठरली. या बैठकीत शिवसेनेकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. राष्ट्रावादी आणि काँग्रेसने साथ दिली. यांनतर हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला.
औरंगाबाद शहराचे नाव “संभाजीनगर” असं करण्याचा मुद्दा शिवसेनेच्या अजेंड्यावर होता. अखेर प्रत्यक्षात नामांतराचा हा प्रस्ताव मान्य करुन शिवसेनेने मास्टर स्ट्रोक मारला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जनसंवादाला सुरुवात झालेली आहे. आपल्याशी संवाद साधून मी अश्वस्त केलं होतं, जे आपण चालू ठेवलं होतं, ते चालूच राहील. आत्तापर्यंतच वाटचाल चांगली झाली. सरकारला कर्जमुक्त केलं. या सगळ्या धबडग्यात काही गोष्टी मागे पडतात. आज जगणं सार्थी झाल्यासारखं वाटलं. औरंगाबादचं संभाजीनगर झालं आणि उस्मानाबादचं धाराशीव झालं. काँग्रेस-राष्ट्रवादीने याला विरोध केला नाही. हा निर्णय होताना शिवसेनेचे चारच मंत्री उपस्थित होते, बाकी कुठे होते ते तुम्ही जाणताच.