तर मूर्ती तुटेल? बाळासाहेबांची शिवसेना राहीली नाही म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं स्फोटक उत्तर

संधी ही प्रत्येकाला चालून येत असते. संधीची माती करायची की सोनं करायची हे तुम्ही ठरवायचं. 300 जागा निवडून आल्या. संधींचं सोन करता आलं नाहीतर कपाळकरंटे ठराल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तर मूर्ती तुटेल? बाळासाहेबांची शिवसेना राहीली नाही म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं स्फोटक उत्तर
उद्धव ठाकरेImage Credit source: लोकसत्ता
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 7:35 AM

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दैनिक लोकसत्ताच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. त्यावेळी गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध विषयावर भाष्य केलं. देशही तुम्ही जिंकलात, राज्य जिंकलत, महापालिका जिंकल्या, सोसायटी तुम्हाला हवी, ग्रामपंचायत तुम्हाला हवीय मग आम्ही काय धुणी भांडी करायची का? धुणी भांडी करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली नव्हती. धुणी भांडी करणाऱ्या मराठी (Marathi) माणसाला स्वाभिमानानं ताठ कण्यानं उभं राहण्यासाठी शिवसेना (Shivsena) स्थापन केली. जेव्हा ती परिस्थिती हिंदूवर आली तेव्हा हिंदूना सुद्धा स्वाभिमान, स्वत्व याची जाणीवर करुन देण्यासाठी हिंदूत्त्वाचा स्वीकार केला. आता पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. वाटेल त्या पद्धतीनं सत्ता मिळवण्यासाठी हिंदूत्त्वाचा वापर होतोय तो गैर आहे. आता लक्षात आलं की ज्या हेतून यूती केली होती तो हेतू बाजूला पडला आहे. अनेक राज्यांमध्ये शिवसेना प्रमुख आणि शिवसेनेचे प्रेमी आहेत. त्यांच्यावर आमच्याकडून अन्याय झाला, आम्ही त्यांना निवडणूक लढू दिली नाही. आता नवी पिढी येत आहे, इतर राज्यातील शिवसैनिक आहेत त्यांना वाट करुन दिली पाहिजे चल लढं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तर मूर्ती तुटेल..

कोणाच्याच म्हणण्याला अर्थ नसतो. मला त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं. आमच्यावर कोणी राजकारण लादलेलं नाही. घरात जन्मापासून वारे वाहतात ते अंगात भिनतात. बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितलं की तू माझा मुलगा आहेस म्हणून शिवसेना आणि शिवसैनिकांवर लादणार नाही. शिवसैनिक आणि जनतेनं स्वीकारलं तर पुढं जा. आता आदित्य त्याच्या वाटेनं पुढं जातोय, लोकांना विचार पटतोय, लोकं स्वीकारतील. देश आणि राज्य अशी विभागणी होत नाही. आवाज कुणाचा तोच आहे, त्यातला खणखणीत पणा तोच आहे. दाबला जाणार नाही. पिढीप्रमाणं थोडासा बदल होतो, तो स्वीकारला पाहिजे. मी शिवसेनाप्रमुखांचं विचार सोडले नाहीत आणि कधी सोडणार नाही, हे विचार आजोबांपासून आहेत. जनतेची सेवा करणारी आमची सहावी पिढी आहे. आमचे पूर्वज धोडपचे किल्लेदार होते. माझ्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे भाषण करता येत नाही, अशी टीका झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं भाषण करता येत नाही पण प्रत्येक काळ असतो. बाळासाहेब ठाकरेंचा काळ मूर्ती बनवण्याचा काळ होता. मूर्ती बनल्यानंतर शिल्पकारांचा मुलगा त्यावर घण घालत बसला तर मूर्ती तुटेल.मूर्ती झाल्यावर त्याच्यावर फुलं वाहायची असतात.वडिलांनी मूर्ती बनवण्यासाठी घेतल्या कष्टानंतर त्यावर फुलं वाहायला पाहिजेत.

संधीचं सोनं केलं नाहीतर कपाळ करंटे ठराल

शिवसेना ग्लोबल नाहीतरी नॅशनल वॉर्मिंग करतंय. इतर राज्यामध्ये बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यांमध्ये केंद्रीय यंत्रणा नाही का? गुजरातमधील घोटाळा आणि पोर्टवर सापडलेल्या ड्रग्जचं काय झालं. महाराष्ट्रात चिमूटभर सापडलं तरी महाराष्ट्राला बदनाम करायचं. सेनापती बापट म्हणायचे महाराष्ट्र आधार भारताचा, महाराष्ट्राचा उपयोग करावा. एका मागून एक धाडी सुरु आहेत. संधी ही प्रत्येकाला चालून येत असते. संधीची माती करायची की सोनं करायची हे तुम्ही ठरवायचं. 300 जागा निवडून आल्या. संधींचं सोन करता आलं नाहीतर कपाळकरंटे ठराल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

छत्रपतींच्या भाषेला अभिजात दर्जा कधी

आता महापालिका निवडणुका येत असल्यानं प्रकल्प येतील. प्रकल्पांच्या घोषणा होतील. त्यांच्याकडून पुढं काय होईल माहिती नाही. आम्ही पूर्ण करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठी भाषा ही आमची तुमची नसून छत्रपतींची भाषा आहे. छत्रपती नसते तर तुम्ही आम्ही राहिलो असतो का? छत्रपतींची भाषेसाठी दिल्ली पुढं हात पसरावे लागतात. छत्रपतींच्या भाषेला दर्जा देण्यासारखी त्यांची लायकी आहे का? हा प्रश्न आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सरकार चालवताना बॅलन्स करावा लागतो

केंद्र अनेक राज्यांची गळचेपी करतंय. तुम्हाला केंद्रात संधी मिळालीय. आम्ही राज्यात संधी मिळवलीय म्हणा, पण आम्ही जनतेची कामं थांबवली आहेत का? कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्या राज्यानं उत्तम कामगिरी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील कौतुक केलं आहेय. उत्तम काम झाल्यानंतर सुद्धा भ्रष्टाचार शोधत असाल तर ती विकृती आहे. शोधा शोधणार असाल तर, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आघाडीच्या काळात देशाची अधिक प्रगती झाली, हा विचार मी पण करतो. स्वबळावर पक्षाची सत्ता आणनं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं स्वप्न असतं. महाराष्ट्राची सद्यस्थिती अशी आहे की कोणत्या एका पक्षाला सत्ता मिळेल अशी स्थिती नाही. मग, कॉमन मिनीमम प्रोग्राम असतो. आघाडीच्या काळात विकास चांगला होतो. मधल्या काळात माझ्या बॅलन्सचा प्रॉब्लेम झाला होता. पण, सरकार चालवताना बॅलन्स करावा लागतो तो मी करतो. तारा जुळवाव्या लागतात, त्या मी जुळवतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.टीका जरूर करा पण ज्यावर करताय त्याला शहाणपणा यावा, अशी करावी, असं उद्धव ठाकरे म्हणााले.

पाहा व्हिडीओ

भाजपसोबत पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं खोचक उत्तर, वाचा सविस्तर

Russia Ukraine : तिरंगा हाती धरला अन् विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, पहिली तुकडी रोमानियाच्या बॉर्डरकडे रवाना

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.