दोन किमी मध्येच फिरायचे की अर्थचक्र फिरवायचं? ‘भ्रमित ठाकरे’ सरकारने निर्णय घ्यावा : चंद्रकांत पाटील

हे 'भ्रमित ठाकरे' ठाकरे सरकार आहे, असा हल्ला चंद्रकांत पाटील यांनी चढवला. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करुन टीकास्त्र सोडलं. (Chandrakant Patil slams Thackeray Sarkar)

दोन किमी मध्येच फिरायचे की अर्थचक्र फिरवायचं? 'भ्रमित ठाकरे' सरकारने निर्णय घ्यावा : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jul 01, 2020 | 3:24 PM

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? असा प्रश्न विचारुन, हे ‘भ्रमित ठाकरे’ सरकार आहे, असा हल्ला चंद्रकांत पाटील यांनी चढवला. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करुन टीकास्त्र सोडलं. (Chandrakant Patil slams Thackeray Sarkar)

“महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमीपर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे. काय ते एकदा ठरवा अर्थचक्र फिरवायचे का दोन किमी मध्येच फिरायचे, तातडीने निर्णय घ्या, जनतेचा संभ्रम दूर करा”, असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं.

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 जुलैपर्यंत अनलॉकिंगचे नियम कायम ठेवताना, घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. 2 किमीच्या बाहेर जाऊ नये, असं म्हटलं आहे. त्यावरुन सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहे. मुंबईत पोलिसांनी अनेकांच्या गाड्या जप्त केल्या आहेत. त्याबाबत काँग्रेसनेही हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील ‘दोन किमी’ प्रवासमर्यादेचा नियम बदलावा, अशा मागणीचं पत्र काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं आहे.

मुंबई पोलिसांकडून 2 किमीची लक्ष्मणरेषा

राज्य सरकारकडून पुनश्च हरि ओम अर्थात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनेक परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई पोलिसांनी प्रत्येक नागरिकासाठी दोन किमीची ‘लक्ष्मणरेषा’ आखून दिली आहे. कोविड-19 चा धोका अजूनही कायम असल्याने सर्वांनी सुरक्षेसाठी वैयक्तिक काळजी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

काय आहेत निर्बंध?

1. घराबाहेरील हालचाली केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच कराव्यात.

2. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.

3. घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. 2 किमीच्या बाहेर जाऊ नये.

4. व्यायामाची परवानगी घरापासून 2 किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.

5. कार्यालय किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच 2 किमीच्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.

6. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

7. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

8. सोशल डिस्टन्सिंगचे निकष न पाळणारी दुकाने इत्यादी बंद करण्यात येतील.

9. रात्री 09. 00 ते पहाटे 05.00 या वेळेत असलेल्या कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.

10. वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने जप्त केली जातील.

सर्व नागरिकांनी जबाबदारीने वागून अनावश्यक फिरणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

(Chandrakant Patil slams Thackeray Sarkar)

संबंधित बातम्या 

Unlock 2 | ‘अनलॉक 2’मध्ये दोन किमीची ‘लक्ष्मणरेषा’, काय आहेत निर्बंध?   

मुंबईतील ‘दोन किमी’ प्रवासमर्यादेचा नियम बदलावा, काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना आवाहन  

30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईत विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई, पोलिसांकडून 4 हजार 864 गाड्या जप्त

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.