निवडणूक आयोग बरखास्त करा, निवडणूक घेऊनच आयुक्त नियुक्त करा, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी भाजप, केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.

निवडणूक आयोग बरखास्त करा, निवडणूक घेऊनच आयुक्त नियुक्त करा, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 2:52 PM

मुंबई : निवडणूक आयोगाने (Election commission) शिवसेना  (Shivsena) पक्ष आणि चिन्ह हे चोरांच्या हाती दिले आहे. निवडणूक आयोग विकले गेले आहे.शिवसेना पक्षाविषयी आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा, पक्षपाती असल्याने हा आयोग बरखास्त केला पाहिजे. प्रत्यक्ष निवडणूका घेऊनच आयुक्त आणि आयोग नेमला पाहिजे, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दिल्याने या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. तर दुसरीकडे राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची त्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांना पुढील रणनीती समजावून सांगण्यात आली.  पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी भाजप, केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरेंची मागणी काय?

उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाने एवढे शपथपत्र, प्रतिज्ञापत्र मागितले. एवढे गठ्ठे दिले. उपद्व्याप केल्यानंतर आयोग जर आमदार खासदारांच्या संख्येवर निर्णय देत असतील तर योग्य नाही. मग एवढा खर्च कशाला का करायला लावला. निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयोग नेमला पाहिजे. हा निकाल मला मान्य नाही. हा अन्याय आहे. हा चोरलेला धनुष्य आहे. हे शिवधनुष्य आहे. ते रावणाला पेललं नाही. ते मिंध्यांना काय कळणार आहे. चिन्हं दिलं तर शिवसेना संपेल असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे….

आयोगाविरोधात आधीच एक केस

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ प्रशांत भूषण यांनी एक केस दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या नेमणुकीविरोधात आहे. आयोगाच्या आयुक्तांची नियुक्त होत असेल तर लोकशाहीचा गाभा धोक्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवर सरकारने आक्षेप घेतला होता. त्यांना थेट न्यायाधीश नेमायचे होते. पण न्यायाधीश ठाम राहिल्याने केंद्र सरकार बॅकफूटवर गेले

लोकशाही फक्त 75 वर्षेच?

निवडणूक आयोगावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘  पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाानाही. निवडणूक आयोगावर केस केली जाईल. खटला भरला जाईल. कुणाच्या निधीवर दरोडा टाकण्याचा अधिकार आयोगाला नाही. त्यांना फक्त चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्याचा अधिकार आहे. निवडणुका घेणं हा अधिकार नाही. निवडणूक आयोग म्हणजे सुल्तान नाही…. हे प्रकरण आता देशभर पेटेल. आज एका पक्षावर वेळ आणल्यावर उद्या दुसरे पक्षही संपवतील की काय ही भीती आहे. इंग्रजांच्या राजवटीनंतर लोकशाही फक्त ७५ वर्ष राहिली पाहिजे काय असं भावी पिढी विचारेल.  निवडणूक आयोग बरखास्त करा. आमचा विश्वास नाहीये. ईव्हीएमवर यापूर्वी आम्ही अविश्वास दाखवला पाहिजे. जी काही सुनावणी असेल ती सर्वोच्च कोर्टात झाली पाहिजे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.