Shivsena Foundation Day | भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार, उद्धव ठाकरे यांचा निर्धार

देशावर चीन नावाचं संकट आहे. त्यासाठी संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक आहे. हिमालयाच्या संकटालासुद्धा महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले (Uddhav Thackeray Speech at Shivsena Foundation Day)

Shivsena Foundation Day | भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार, उद्धव ठाकरे यांचा निर्धार
Follow us
| Updated on: Jun 19, 2020 | 2:34 PM

मुंबई : हिमालयाच्या संकटालाही महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो. चीनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक आहे. आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला, तो मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे, असं उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने म्हणाले. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर हा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन आहे. (Uddhav Thackeray Speech at Shivsena Foundation Day)

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-दुर्दैवी परिस्थिती आहे, तोंडावर मास्क लावायला लागला आहे. पण आपलं तोंड कोणी बंद करु शकत नाही

-कोरोनाचं संकट आलं तेव्हा कस्तुरबा आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या, त्या आता आपण 100 लॅब केल्या आहेत. आपण लॅब आणखी वाढवणार आहोत.

-मला काही जण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहेत, पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहेत. शिवसैनिकांचं कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे.

-देशावर चीन नावाचं संकट आहे. त्यासाठी संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक आहे. हिमालयाच्या संकटालासुद्धा महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो.

-आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला, तो मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे

-अन्याय सहन करु नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे.

-विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. प्राण जाय पर वचन न जाये ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुखसुद्धा लाचार होणार नाही.

-शिवसेना पक्षाची स्थापना झाली त्यावेळी एकही नगरसेवक नव्हता. त्यावेळी नारळ फोडला त्याच पाण्याचे थेंब माझ्या अंगावर उडाले त्यात मी ओला चिंब झालो आहे, हे शिवसैनिकामुळे. शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे.

-मुंबईही रक्त सांडून महाराष्ट्राने मिळवलेली आहे कोणाला आंदण म्हणून दिलेली नाही. म्हणून आपण रक्तदानाचा विश्वविक्रम केला आहे.

-शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही. (Uddhav Thackeray Speech at Shivsena Foundation Day)

-मी शिवनेरीला आणि एकविरेला दर्शनाला गेलो. शिवनेरीची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला, आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. शिवनेरीच्या मातीची ही कमाल आहे.

-मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नाही.

-आता गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसेना हा कार्यक्रम सुरु करा, शिवसेनेच्या शाखा या आता दवाखाने बनतील. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जसे की, मास्क, पीपीई किट, हॅन्ड ग्लोज.

-जीवाची पर्वा न करता बेभान होऊन जनतेसाठी झटणारा हा शिवसैनिकच असू शकतो. वादळ येऊ दे, चक्रीवादळ येऊ दे, कोणतंही संकट येऊ दे, तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे मला कशाचीही भीती नाही. अशीच साथ सर्वांनी नेहमीच शिवसेनेसोबत द्या आणि सर्वांनी आपली काळजी घ्या.

-भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार

कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरु असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सामूहिकरित्या साजरा होणार नाही. 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेने गेल्या 54 वर्षात महाराष्ट्रासह देशभरात आपला दबदबा निर्माण केला आहे.

“शिवसैनिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तळागाळात प्रयत्न करावेत. शिवसेना शाखेत आधीपासूनच रुग्णांची तपासणी करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहेच, आता इतर गरजूंनाही मदतीचं सत्र सुरुच ठेवा” असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं होतं. (Uddhav Thackeray Speech at Shivsena Foundation Day)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.