स्वबळ नरमलं! जागावाटपावर उद्धव ठाकरेंची अमित शाहांशी चर्चा

मुंबई : आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवू, अशी घोषणा करुन काही महिने उलटत नाहीत, तोच शिवसेनेचं ‘स्वबळ’ नरमल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. कारण आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी म्हणजे 11 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे आणि अमित शाह […]

स्वबळ नरमलं! जागावाटपावर उद्धव ठाकरेंची अमित शाहांशी चर्चा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवू, अशी घोषणा करुन काही महिने उलटत नाहीत, तोच शिवसेनेचं ‘स्वबळ’ नरमल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. कारण आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी म्हणजे 11 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाली. काल एकंदरीतच सेना-भाजपमधील युतीच्या प्रयत्नांना वेग आला होता.

उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात फोनवर काय चर्चा झाली?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि आगामी निवडणुकांसाठी जागावाटपाबाबत चर्चा केली. या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी ‘मोठय़ा भावा’चा आग्रह कायम ठेवत, 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव अमित शाहांपुढे ठेवला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, लोकसभेसोबतच विधानसभेसाठीही जागावाटप व्हावे, अशीही उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांसमोर भूमिका मांडली.

1995 साली शिवसेनेने 169, तर भाजपने 116 जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत शिवसेना-भाजप या पक्षांनी 138 जागा जिंकून युतीचे पहिले सरकार राज्यात स्थापन केले होते. जागावाटपाच्या या सूत्रानुसार राज्यात युतीचे सरकार आले, तर मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचाच दावा असेल, असेही सांगितले जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.