Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, परिसरात गर्दी वाढली
आजपासून राज्यात गणेश उत्सवाला जोरात सुरुवात झाला आहे. त्यामुळे राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. कारण मागच्या दोन वर्षांपासून गणेश उत्सव कोरोनाच्या नियमावलीत साजरा करावा लागला होता.
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतलं सहकुटुंब लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja 2022) दर्शन घेतलं आहे. काल रात्रीपासून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रांग लागली आहे. कोरोनाच्या काळात अत्यंत संयमाने गणेश उत्सव साजरा करण्यात आला. दोन वर्षानंतर लोकांचा उत्साह अधिक दिसायला लागला आहे. लालबागच्या राज्याचं दर्शन घेण्यासाठी लोकं देशातून येतात. तसेच पहिल्या दिवसांपासून तिथं भक्तांची रांग पाहायला मिळते. त्यामुळे लालबाग परिसरात भक्तांची अधिक गर्दी असते. तसेच गणेश गल्लीतील (Ganesh Galli) मानाच्या गणपतीचं देखील दर्शन घेतलं आहे.
लालबागच्या राज्याचं दर्शन दरवर्षी अनेक राजकीय नेते घेतात. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटी तिथं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे लालबागच्या परिसरात भक्तांची गर्दी असते. मंडळातील कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत सगळी व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिका आणि गरजेच्या वस्तू देखील तिथं ठेवण्यात आल्या आहेत. आजपासून पुढचे दहा दिवस अधिक राजकीय नेते, बॉलिवूडकर दर्शनासाठी येतात.
आजपासून राज्यात गणेश उत्सवाला जोरात सुरुवात झाला आहे. त्यामुळे राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. कारण मागच्या दोन वर्षांपासून गणेश उत्सव कोरोनाच्या नियमावलीत साजरा करावा लागला होता. यंदा मोकळीक मिळाल्याने राज्यात उत्साहाचं वातावरण आहे.