Uddhav Thackeray : ‘काय तो सवाल जवाब होऊनच जाऊदे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट इशारा; मुख्यमंत्रीपदाबाबतही मोठं वक्तव्य
14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यावेळी काय तो सवाल जवाब होऊनच जाऊदे असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी आज दिलाय. मुख्यमंत्री ठाकरे आज भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या रौप्य महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय. मशिदींवरील भोंग्यांवरुन राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) अल्टिमेटम दिलं आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. गुढीपाडव्याची सभा असेल, ठाण्यातील उत्तर सभा असेल किंवा औरंगाबादेतील सभा असेल, या तिनही सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढले. राज ठाकरेंच्या सभांच्या धडाक्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही जाहीर सभेची घोषणा केलीय. 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यावेळी काय तो सवाल जवाब होऊनच जाऊदे असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी आज दिलाय. मुख्यमंत्री ठाकरे आज भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या रौप्य महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्रीपद माझं स्वप्न नव्हतं- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकारणात देशाचे शत्रू बाजुला पडले आहेत. पण पक्षाचे शत्रू कोण कायकडे पाहिलं जातंय. घाणेरडं राजकारण सुरु झालंय. मुख्यमंत्री बनणे हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. पण मुख्यमंत्री माझ्या पक्षाचाच होईल हे माझं स्वप्न होतं. तसंच खासगीकरणाची खाज वाढत आहे. भविष्य अंधारात जाणार असेल तर आता तुम्ही कामाला लागणं पाहिजे. दमदार वाटचाल सुरु असताना आता थांबायचं नाही. राज ठाकरे यांनी लावलेल्या सभांच्या धडाक्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आता थेट इशारा दिलाय. 14 तारखेला सभा घेतोय. अजून किती दिवस ऐकणार? काय तो सवाल जवाब होऊनच जाऊ दे, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय.
बाबरी पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते?
उद्धव ठाकरे यांनी आठवडाभरापूर्वी वर्षा बंगल्यावर शिवसनेचे नेते, खासदार आणि प्रवक्त्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत शिवसंपर्क अभियान आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तुटून पडण्याचे आदेश शिवसेनेच्या नेत्यांना दिले. तसंच बाबरी मशिद पाटली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेंचं काय सुरु होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. तसंच आरोप करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्यांवर तुटून पडा, सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या. त्यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा. आपली कामं लोकांपर्यंत पोहचवा, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्यांना दिले आहेत.