Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या, पण 1500 रुपयात महाराष्ट्र विकणार?; उद्धव ठाकरे यांचा सवाल

लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. या योजनेचा लाभ जनतेने घ्यावाच कारण हे पैसे जनतेचे असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले...

लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या, पण 1500 रुपयात महाराष्ट्र विकणार?; उद्धव ठाकरे यांचा सवाल
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 10:10 PM

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झाला. या मेळाव्याची सुरुवात राड्याने झाली. उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ फेकले.त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणूकात मनसे आणि शिवसेनेत मोठे राडे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन जोरदार टिका केली. आपण मराठवाडा दौऱ्यात तेथील शेताच्या बांधावर महिलांना विचारले की 1500 रुपये मिळणार काय वाटतंय तर त्या म्हणाल्या की 1500 रुपयांत काय होते असा सवाल त्यांनी आपल्या केल्याचे उद्धव ठाकरे यांनी भाषणात सांगितले.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आम्ही पाठून वार करणारे नाही. समोरा समोर वार करणारे आहोत. जे काही करायचं आहे ते विधानसभा निवडणुकीत करायचं आहे. लोकसभा लांबली. पाच टप्पे. तुम्ही काय क्रिकेट खेळत आहात का ? असा सवाल ठाकरे यांनी केंद्र सरकारला उद्देश्यून केला. ते पुढे म्हणाले की पाच टप्प्यात निवडणूक घेतली तशी आता कानावर वेगळीच माहिती येते आहे. आता कानावर येतंय की नोव्हेंबरमध्ये हे निवडणूक घेणार आहेत. कारण चार महिने हप्ते दिले की महिलांचा विश्वास बसेल आणि मतदान होईल असं त्यांना वाटतंय असेही उद्धव  ठाकरे म्हणाले.

१५०० रुपयात महाराष्ट्र विकणार?

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की कॉंग्रेसच्या राजवटीत मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी अशीच घोषणा केली होती.आणि शिवसैनाप्रमुखांनी कृषी पिकविम्याचे कर्ज माफ करू असं आश्वासन दिले होते. परंतू सुशील कुमार शिंदे यांनी ही योजना सुरू केली. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला मतदान केलं. ते सत्तेत आले. त्यानंतर सुशीलकुमारांची विकेट पडली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले . त्यांनी दामदुपटीने बिल पाठवलं. बिल भरा नाही तर तुरुंगात पाठवू असा इशारा दिला. तशी ही मिंध्याची योजना आहे. योजना आहे, लाभ घ्या. ते तुमचे पैसे आहेत. त्यांच्या खिशातील नाही. पण 1500 रुपयात महाराष्ट्र विकणार? असा सवाल ही उद्धव ठाकरे यांनी केला.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.