भगव्याला डाग लावणाऱ्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले

मी आज केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन आलो आहे. बाकी माझ्याकडे काहीच नाही. तरीसुद्धा तुम्ही एवढे प्रचंड संख्येने आलेले आहात.

भगव्याला डाग लावणाऱ्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 8:27 PM

रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी महाड येथे सभा घेतली. या सभेला मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत स्नेहल जगताप यांनी काँग्रेस सोडून शिवबंधन हाती घेतलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला केला. भगव्याला डाग लावणाऱ्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. कार्यक्रमात फटाके फोडले जात होते. त्यांचा आवाज येत होता. त्यावेळी फटाके शिवसैनिकांसारखे एकदा पेटले की ऐकत नाही, असंही त्यांनी सुनावलं.

शिवसैनिकांना पेटवण्याचा प्रयत्न करू नका

उद्धव ठाकरे म्हणले, महाड मतदारसंघ शिवसेनेचा आहे. तो केवळ निवडणुकीपुरता नाही. मी कागदावर लिहून ठेवलं आहे की एकही मतदारसंघ सुटता कामा नये. फटाके सुद्धा शिवसैनिकासारखे एकदा पेटले तर ऐकत नाहीत. म्हणून कोणी शिवसैनिकाला पेटवायचा प्रयत्न करु नये. कारण मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजण्याशिवाय राहणार नाहीत.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडी म्हणून मी पुढे जातोय मग मी काँग्रेस फोडतोय का? तसं नाहीय. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या निवडणुका झाल्या. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार जिंकला. शिवसैनिकांनी मेहनत घेतली. नुसती जिंकून आणण्यासाठी मेहनत घेतली नाही. तर आपला उमेदवार लिंगाडे आपला शिवसैनिक तिकडे दिला आणि तिकडे तो आमदार झाला. कारण एवढ्या एकजुटीने लढल्याशिवाय समोर जी हुकूमशाही वृत्ती उभी आहे. तिचा पराभव करणार आहोत, असं ठाकरे यांनी म्हंटलं.

भाजपने नीच डाव केला

भाजपने एवढा नीच डाव केला की आपलं चिन्ह आणि धनुष्यबाण चोरलं. ते त्यांच्या खोक्यावर मारलं. मी आज केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन आलो आहे. बाकी माझ्याकडे काहीच नाही. तरीसुद्धा तुम्ही एवढे प्रचंड संख्येने आलेले आहात. जगताप कुटुंबीय आले आहेत. अद्वय हिरे आले. आणखी काही जण येणार आहेत. पण असं आश्चर्य याआधी पाहिलं नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.