AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : पालघर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार, 50 शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाण्याची तयारी केली आहे. कारण रोज नव्याने प्रवेश होत असल्याचे जाहीरपणे दिसत आहे. मीरा भाईदरचे अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.

Eknath Shinde : पालघर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार, 50 शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील
पालघर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडारImage Credit source: facebook
| Updated on: Jul 16, 2022 | 8:46 AM
Share

मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यापासून शिवसेनेतील (Shivsena) अनेक नेते कार्यकर्ते रोज शिंदे गटात सामील होत आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून शिंदे गटात जोरदार भरती सुरु आहे. बंड केलेले आमदार आपले शक्ती प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण पालिकेची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. त्या निवडणुकीत फुटीचे नक्की पडसाद पाहायला मिळतील. काल रात्री उशिरा पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit), वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेविका यांचे पती दिवाकर सिंग, बविआतील काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले वसई विरार चे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांच्यासह 50 शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. काल त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समर्थन दर्शविलं.

मीरा भाईदरचे अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाण्याची तयारी केली आहे. कारण रोज नव्याने प्रवेश होत असल्याचे जाहीरपणे दिसत आहे. मीरा भाईदरचे अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. पालघर जिल्ह्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांना कबर कसायला लागणार आहे. कारण काही महिन्यात पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी तिथं शिवसेनेला सगळी तयारी नव्याने करावी लागणार आहे.

राजेंद्र जंजाळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी

युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तशी माहिती जाहीर केली आहे. युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांनी पक्षाच्या विरुद्ध काम केल्याने त्यांची शिवसेनेतून हकलपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. हकालपट्टीची घोषणा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवा सेनेच्या निष्ठा मेळाव्यात केली. राजेंद्र जंजाळ यांनी शिवसेनेच्या बंडखोर गटाला समर्थन दिल्याने हकालपट्टी करण्यात आली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.