जिल्हा बँकेचं निमित्त, दोन राजे पुन्हा आमनेसामने, उदयनराजे म्हणतात, पॅनेलमध्ये मी का नाही, शिवेंद्रराजे म्हणतात, ते पवारांना विचारा!

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आलीय. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालच संपलीय. पण प्रथेपरंपरेप्रमाणे साताऱ्यातल्या दोन्ही राजेंमध्ये सुंदोपसुंदी सुरुच आहे. राष्ट्रवादीप्रणित सर्वसमावेशक पॅनेलमध्ये मी का नाही?, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला होता.

जिल्हा बँकेचं निमित्त, दोन राजे पुन्हा आमनेसामने, उदयनराजे म्हणतात, पॅनेलमध्ये मी का नाही, शिवेंद्रराजे म्हणतात, ते पवारांना विचारा!
उदयनराजे आणि उदयनराजे
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 3:23 PM

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आलीय. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालच संपलीय. पण प्रथेपरंपरेप्रमाणे साताऱ्यातल्या दोन्ही राजेंमध्ये सुंदोपसुंदी सुरुच आहे. राष्ट्रवादीप्रणित सर्वसमावेशक पॅनेलमध्ये मी का नाही?, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. त्यावर हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा पवारसाहेबांना विचारा, असं म्हणत उदयनराजेंचा बॉल पुन्हा त्यांच्याच कोर्टात शिवेंद्रराजेंनी ढकललाय.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीप्रणित सर्वसमावेशक पॅनलमध्ये अद्याप तरी जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी दबाव तंत्राचा वापर करत बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे संचालक मंडळ यांना खिंडीत पकडायला सुरुवात केली आहे.

उदयनराजेंना पॅनल मध्ये का घेतले नाही या विषयी त्यांनी रामराजे, शरद पवार, अजित पवार यांच्याशी बोलून घ्यावे. साताऱ्यात जे काय होतंय ते सर्व उदयनराजेंमुळे होत असल्याचा टोमणा मारत सातारला ऑक्‍सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता मात्र तो सुद्धा उदयनराजेंनी सुरु केला, अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंची नक्कल केली. ते त्यांच्याच स्टाईमध्ये चुटकी वाजवून वगैरे…!

उदनयराजेंची चाल, शिवेंद्रराजेंना खिडींत गाठायचं

शिवेंद्रराजे अध्यक्ष असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर कारखान्याला कर्ज कसे दिले?, असा सवाल उपस्थित करत मी बँकेत जागा अडविण्यासाठी संचालक झालो नाही तर शेतकऱ्यांच्या हिताची देखरेख करण्याकरिता बँकेत मला पाठवले असल्याचे उदयनराजे म्हणाले. यावेळी गुरु कमोडीटीचा गुरु कोण? असा सवाल उपस्थित करून त्यांनी अजित पवारांवर त्यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

बँकेची चौकशी नाही लागली, फक्त माहिती दिली, उदयनराजे जरा माहिती घ्या!

यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागली नाही, असं सांगत उदयनराजेंना माहित नसावे ED ने जी माहिती मागवली ती जरंडेश्वर कारखान्यांना दिलेल्या फायनान्स बाबत होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर ची सर्व कागदपत्रे तपासून हे कर्ज दिले असून सध्या जरंडेश्वरचे सर्व हप्ते नियमित सुरु असल्याचे ते म्हणाले.

मागे तर म्हटले, बँकेचं काम चांगलंय, मग आता झालं?

उदयनराजे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर केलेल्या आरोपावर मला माहिती नाही, असे सांगून मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेची बैठक पार पडली. त्यामध्ये त्यांनी बँकेला नावाजले होते. तुमच्या चॅनलने प्रसिद्धी देखील दिली होती. टीव्ही ९ मराठीचे आवर्जून नाव घेत प्रसार माध्यमांना उदयनराजेंची मोबाईलवरची मुलाखत त्यांनी दाखवली. या मुलाखतीत उदयनराजे ‘बँक चांगली चालली आहे’, असं म्हणत आहे, मग आता माशी कुठे शिंकली?, असा सवाल शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना विचारला.

(udyanraje vs Shivendraraje over Satara District co operative Bank)

हे ही वाचा :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.