उल्हासनगर महापौरपदासाठी शिवसेना vs भाजप, दुसऱ्या मित्रपक्षाकडूनही भाजपला डोकेदुखी

भाजपकडून जमनादास पुरसवानी, साई पक्षाकडून जीवन इदनानी आणि शिवसेनेकडून लीलाबाई अशान यांनी महापौरपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उल्हासनगर महापौरपदासाठी शिवसेना vs भाजप, दुसऱ्या मित्रपक्षाकडूनही भाजपला डोकेदुखी
Follow us
| Updated on: Nov 19, 2019 | 8:11 AM

अंबरनाथ : उल्हासनगरच्या महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे 22 नोव्हेंबरला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना (Ulhasnagar Mayor Shivsena Vs BJP) अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे.

महापौरपदासाठी सोमवारी 3 तर उपमहापौरपदासाठी 4 अर्ज दाखल दाखल करण्यात आले. भाजपकडून जमनादास पुरसवानी, साई पक्षाकडून जीवन इदनानी आणि शिवसेनेकडून लीलाबाई अशान यांनी महापौरपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उपमहापौरपदासाठी भाजपचे विजय पाटील, साई पक्षाचे दीपक शेरवानी, रिपाइं आठवले गटाचे भगवान भालेराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत गंगोत्री यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना मित्रपक्ष असलेल्या ओमी कलानी गटाचे नगरसेवक मात्र सोबत नव्हते. त्यामुळे निवडणुकीत टीम ओमी कलानीच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि साई पक्षाची सत्ता आहे. मात्र तरीही साई पक्षाने स्वतंत्रपणे महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता शेवटच्या दिवशी कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो, हे पाहावे लागणार आहे.

भाजपच्या तिकीटावर लढलेल्या पप्पू आणि ज्योती कलानी यांच्या स्नुषा, ओम कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी उल्हासनगरच्या महापौर आहेत. तर साई पक्षाच्या जीवन इदनानी यांच्याकडे उपमहापौरपदाचा कार्यभार आहे. मात्र भाजपसोबत युती असतानाही इदनानी यांनी थेट महापौरपदाच्या शर्यतीत उडी घेत भाजपविरोधातच अर्ज भरला आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेसोबत पाहायला मिळाले. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेना आणि उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी अशी आघाडी झाल्याची चर्चा आहे.

मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांची निवड निश्चित

शिवसेनेने आमचा महापौर होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर टीम ओमी कलानी आमच्या सोबत आहे, असा दावा भाजपचे महापौरपदाचे उमेदवार जमनादास पुरसवानी यांनी केला आहे.

दुसरीकडे, पक्षाचा आदेश आला तर राष्ट्रवादी शिवसेनेला मदत करेल, असं उमेदवार भरत गंगोत्री यांनी सांगितलं. त्यामुळे उल्हासनगर महापौरपदाची निवडणूक रंगतदार (Ulhasnagar Mayor Shivsena Vs BJP) होणार, यात शंका नाही.

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.