उल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक, टीम कलानी शिवसेनेसोबत, भाजपच्या पाठीशी कोण?

16 सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचे 8, रिपाइं 1, शिवसेनेचे 5, राष्ट्रवादी आणि साई पक्षाचा प्रत्येकी 1 सदस्य आहे

उल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक, टीम कलानी शिवसेनेसोबत, भाजपच्या पाठीशी कोण?
cm uddhav thackeray- devendra fadnavis
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 11:09 AM

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या म्हणजेच बुधवारी ही निवडणूक होणार असून यासाठी शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. तर चार प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूकही जाहीर झाली असून त्यात टीम ओमी कलानी महाविकास आघाडीच्या सोबत आहे. (Ulhasnagar Municipal Corporation Standing Committee Election Shivsena Vs BJP)

कोणत्या पक्षाचे किती सदस्य?

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपकडून दीपक उर्फ टोनी सिरवानी आणि शिवसेनेकडून कलवंतसिंग सोहता यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र 16 सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचे 8, रिपाइं 1, शिवसेनेचे 5, राष्ट्रवादी आणि साई पक्षाचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. त्यातच भाजप आणि रिपाइं एकत्र आल्यामुळे यंदा भाजपचाच सभापती होणार हे निश्चित आहे.

फोडाफोडी टाळण्याचे भाजपचे प्रयत्न

मागील निवडणुकीत समसमान संख्याबळ असताना शिवसेनेनं भाजपच्या एका सदस्याला फोडून थेट सभापती केलं होतं. त्यामुळे यंदा फोडाफोडी होऊ नये, यासाठी भाजपनं आपले सदस्य अज्ञात स्थळी रवाना केले आहेत.

रिंगणात कोण कोण?

दुसरीकडे चार प्रभाग समित्यांसाठी भाजपतर्फे अनुक्रमे मीना कौर लबाना, महेश सुखरामानी, रवी जग्यासी आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर सुमन सचदेव यांनी अर्ज भरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून हरेश जग्यासी आणि अंजना म्हस्के, छाया चक्रवर्ती, दीप्ती दुधानी, विकास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र खरी रंगत स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत असून उद्याच्या निवडणुकीत शिवसेना काही नवीन खेळी खेळते? की भाजपचाच सभापती होतो? याकडे उल्हासनगरवासीयांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या :

राणेंना मंत्रिपद म्हणजे शिवसेनेच्या जखमेवर मीठ? सेना-भाजप एकत्र येण्यात कायमचा अडथळा?

‘दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’, शिवसेनेचा टोला

(Ulhasnagar Municipal Corporation Standing Committee Election Shivsena Vs BJP)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.