UMC election 2022 : शिवसेना की भाजपा? बदललेल्या रचनेत प्रभाग 14मध्ये कुणाचं पारडं ठरणार जड? वाचा सविस्तर…

2017मध्ये भाजपा आणि शिवसेनेतील जागांमध्ये खूपच कमी अंतर होते. यावेळी राजकीय चित्र पूर्ण वेगळे आहे. शिवसेनेतील बंडखोरीचा परिणार महापालिकेच्या जागांवर होतो का, याची उत्सुकता असणार आहे.

UMC election 2022 : शिवसेना की भाजपा? बदललेल्या रचनेत प्रभाग 14मध्ये कुणाचं पारडं ठरणार जड? वाचा सविस्तर...
उल्हासनगर महापालिका, वॉर्ड 14Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 8:30 AM

उल्हासनगर : राज्यात यावर्षी निवडणुकांचे वारे (Election 2022) आहे. विविध महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. एकीकडे राज्यातील परिस्थिती यावर्षी अधिकच अस्थिर बनली. महाविकास आघाडीतील तीन पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकीकडे तर शिंदे गट आणि भाजपा हे दुसऱ्या बाजूने पाहायला मिळत आहेत. स्थानिक पातळीवरही त्याचे परिणाम होणार आहेत. त्यामुळे महापालिकेतील राजकीय स्थितीही पूर्णपणे वेगळी असणार आहे. 2017ला उल्हासनगर महापालिकेत (UMC election 2022) भाजपाने सत्ता मिळवली होती. तर शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. 78पैकी 32 जागा भाजपाकडे तर शिवसेनेला 25 जागा मिळाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 14मध्येही शिवसेनेने विजय मिळवला होता. यावेळी मात्र प्रभागरचनाही बदलली आहे. तीन सदस्यांची प्रभागरचना (Ward) असणार आहे. तर जागा 89 असणार आहेत. आरक्षणही बदलल्याने आपल्यासाठी योग्य असा प्रभागही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना शोधावा लागणार आहे.

प्रभागातील व्याप्ती कशी?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, सानप चाळ, शिवसेना शाखा, माऊली सलून, गॅस गोडाऊन, प्रबुद्ध नगर, शांतीग्राम विद्यालय, रेमड शोरूममागील परिसर, साईबाबा नगर, कैलाश नगर, केदार पाडा, आशा सोसायटी, अग्निशामक मागील परिसर.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग क्रमांक 14ची एकूण लोकसंख्या 15,230 एवढी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4261 एवढी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 490 इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

कोण मारणार बाजी?

2017मध्ये भाजपा आणि शिवसेनेतील जागांमध्ये खूपच कमी अंतर होते. यावेळी राजकीय चित्र पूर्ण वेगळे आहे. शिवसेनेतील बंडखोरीचा परिणार महापालिकेच्या जागांवर होतो का, याची उत्सुकता असणार आहे.

प्रभाग 14 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 14 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 14 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

विजयी उमेदवार (2017)

शिवसेनेतर्फे सुरेखा हनुमंत आव्हाड यांनी मागील वेळी प्रभाग 14मध्ये बाजी मारली होती. यंदाच्या बदललेल्या प्रभागरचनेत शिवसेना विजयी होते का, हे पाहावे लागणार आहे.

आरक्षण कसे?

तीन सदस्यांचा प्रभाग असणार आहे. त्यामुळे प्रभागातील आरक्षण यावेळी बदलले आहे. हे आरक्षणही जाहीर झाले आहे. 14 अ हा अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. ब हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग उमेदवारासाठी तर क हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.