UMC Election 2022 Ward No 20 | गेल्यावेळी शिवसेनेने या वॉर्डमध्ये लावला सुरुंग, यंदा तर राष्ट्रवादीचे ही भाजपसमोर आव्हान, स्पर्धेत कोण टिकणार?

UMC Election 2022 Ward No 20 | उल्हासनगरात पप्पु कलानी यांचं गारुड होतं. त्यांच्यानंतर त्यांच्या पिढीने सूत्र हाती घेतली आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये शिवसेनेने गेल्यावेळी भाजपचा घाम काढला होता. यंदा काय निकाल लागेल याची उत्सुकता

UMC Election 2022 Ward No 20 | गेल्यावेळी शिवसेनेने या वॉर्डमध्ये लावला सुरुंग, यंदा तर राष्ट्रवादीचे ही भाजपसमोर आव्हान, स्पर्धेत कोण टिकणार?
शिवसेना मारणार बाजी की राष्ट्रवादी देणार आव्हानImage Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 11:43 AM

UMC Election 2022 Ward No 20 | उल्हासनगरात पप्पु कलानी यांचं गारुड होतं. त्यांच्यानंतर त्यांच्या पिढीने सूत्र हाती घेतली. भाजपानंतर त्यांनी आता हातावर घड्याळ बांधलं आहे. त्यामुळे महापालिकेची (Ulhasnagar Municipality) निवडणूक रंगतदार ठरणार आहे. एकीकडे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी शिवसेनेत बंड करुन भाजपसोबत सत्तेचा महामेरु सहज पार केला. तर त्याचदरम्यान भाजपशी (BJP) नाते तोडत कलानी यांच्या सूनेसह इतर नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)जवळ केली. जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्या खेळीमुळे सर्वच आघाड्यावर जोशात असलेली भाजप उल्हासनगरात मात्र बॅकफुटवर आली. तसं तर हे कामगारांचं शहर. देशभरातील कानाकोपऱ्यातील कामगार या ठिकाणी आलेत आणि त्यांनी चीनसारखं मार्केट सार्वजनिक करुन टाकलं. कोणत्या ही गोष्टीची हुबेहुब दुसरी कॉपी करण्यात उल्हासनगर जगात सर्वात पुढचे शहर आहे. भाजपच्या मदतीने शिवसेनेतील (Shivsena) आमदारांनी बंड केल्यानंतर लागलीच या शहरानं ही बंडाची कॉपीच केली नाही तर अंमलबजावणी ही केली आहे. आता येणारी महापालिका निवडणूक अजून काय रंगत दाखवते ते लवकरच कळेल.

पप्पु कलानी यांचा करिष्मा या शहरावर कायम आहे. त्यांच्या पुढच्या पिढीने राजकारणाची सूत्र हाती घेतली आहे. 2017 मधील निवडणुकीत या पालिकेत एक करिष्मा झाला होता. सर्वाधिक नगरसेविका निवडून येण्याची किमया याच महापालिकेत घडली होती. एकूण 78 नगरसेवकांपैकी 47 नगरसेविका या महिला होत्या. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपने 33 नगरसेवक निवडून आणले होते. त्यापैकी 21 महिला नगरसेवक निवडून आल्या होत्या. त्यामुळे यावेळी पुन्हा महिला राज दिसून येईल का? भाजपला शहा काटशहा देण्यात राष्ट्रवादी यशस्वी होईल का? याकडे मतदारांचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर महापालिकेची सध्यस्थिती

उल्हासनगर महापालिकेत एकूण 89 नगरसेवक आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी एक आणि महिलांसाठी 36 जागा राखीव आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 30 प्रभाग आहेत. उल्हासनगरची लोकसंख्या 5,06,098 एवढी आहेत. त्यात महिलांची संख्या 2,69,048 एवढी असून पुरुषांची संख्या 2,37,050 एवढी आहे. वॉर्ड क्रमांक 20 ची एकूण लोकसंख्या 15,684 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीचे 2519 तर अनुसूचित जमातीचे 281 जणांचा समावेश आहे.

वॉर्ड क्रमांक 20 आरक्षण

वॉर्ड क्रमांक 20 अ अनुसूचित जाती वॉर्ड क्रमांक 20 ब सर्वसाधारण महिला वॉर्ड क्रमांक 20 क सर्वसाधारण

यापूर्वी वॉर्ड क्रमांक 20 मधून निवडून आलेले सदस्य

वॉर्ड क्रमांक 20 अ कविता सुरेश गायकवाड भाजप

वॉर्ड क्रमांक 20 ब आकाश परशुराम पाटील शिवसेना

वॉर्ड क्रमांक 20 क विकास परशुराम पाटील शिवसेना

वॉर्ड क्रमांक 20 मधील परिसर कोणता?

उल्हासनगर रेल्वेस्टेशन परिसर, चंद्रमनी बुद्ध विहार परिसर, गुरुद्वारा लालचक्की परिसर, ज्योती कॉलनी परिसर, रामनगर परिसर, टागोर सोसायटीसमोर, कपलेश्वर महादेव मंदिरासमोरील भाग, मद्रासी पाडा परिसर, लेप्रसीकॉलनी, रामनगर झोपडपट्टी, सिद्धार्थ नगर, सिताराम नगर, गणेश नगर, शिवाजी मैदान, शिव मार्ग, सखाराम नगर

पक्षउमेदवारविजयी
राष्ट्रवादी काँग्रेस
भाजप
शिवसेना
मनसे
अपक्ष
इतर
पक्षउमेदवारविजयी
राष्ट्रवादी काँग्रेस
भाजप
शिवसेना
मनसे
अपक्ष
इतर
पक्षउमेदवारविजयी
राष्ट्रवादी काँग्रेस
भाजप
शिवसेना
मनसे
अपक्ष
इतर

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.