Gadkari vs Patole : नितीन गडकरी-नाना पटोले यांची ‘कोर्ट लढाई’, दोन बड्या नेत्यांमध्ये ‘सामना’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला आहे. पटोले यांचे निवडणूक याचिकेमधील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर आहे, असा दावा करणारा अर्ज त्यांनी न्यायालयात दाखल केला आहे.

Gadkari vs Patole : नितीन गडकरी-नाना पटोले यांची 'कोर्ट लढाई', दोन बड्या नेत्यांमध्ये 'सामना'
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 9:45 AM

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला आहे. पटोले यांचे निवडणूक याचिकेमधील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर आहे, असा दावा करणारा अर्ज त्यांनी न्यायालयात दाखल केला आहे. पहिल्यांदा पटोले यांनी गडकरींच्याविरोधात अर्ज दाखल केला होता. आता गडकरींनी पटोलेंविरोधात अर्ज दाखल करुन जोरदार पलटवार केला आहे.

नाना पटोले यांनी काय आरोप केला होता?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी नागपूरमधून विजयी झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

उत्पन्नान स्त्रोत शेती असल्याचे नमूद केले तसेच त्यांनी कायद्यातील विविध तरतूदी न नियांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करुन नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असं पटोले यांचं म्हणणं आहे.

गडकरींचा अर्ज कशासाठी?

गडकरी यांना ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारिज करुन घ्यायची आहे. त्यामुळे त्यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम 11 (ए) अंतर्गत हा अर्ज दाखल केला आहे.

पटोले यांना उत्तरासाठी वेळ

या प्रकरणावर गुरुवारी न्या. अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, पटोले यांनी या अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी 24 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. गडकरी यांच्यावतीने वरिष्ठ अॅड. सुनील मनोहर तर पटोले यांच्यावतीने अॅड सतीश उके यांनी बाजू मांडली.

(Union Minister Nitin Gadkari Application Nagpur Court Against Congress Nana patole)

हे ही वाचा :

काँग्रेसने देशाला बलशाही केलं, आता मोदी देश विकायला निघालेत, कार्यकर्त्यांनो कामाला लागा, संविधान वाचवा : नाना पटोले

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.