उर्मिला मातोंडकरांकडून शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार; सूत्रांची माहिती

कालपासून उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषेदवर जाणार, अशी चर्चा रंगली होती. | urmila matondkar

उर्मिला मातोंडकरांकडून शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार; सूत्रांची माहिती
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 7:56 PM

मुंबई: विधानपरिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित जागेसंदर्भात उर्मिला मातोंडकर (urmila matondkar) यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिल्याची माहिती समोर येत आहे. कालपासून उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषेदवर जाणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, उर्मिला काँग्रेस या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्यामुळे ही शक्यता कितपत खरी ठरणार, याविषयी साशंकता होती. मात्र, सूत्रांनी, ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या माहितीनुसार उर्मिला मातोंडकर शिवसेनेचा भगवा हातात घेण्यास राजी झाल्याचे समजत आहे. (urmila matondkar gives green nod to ShivSena proposal for Governor appointed MLC)

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. अभिनेत्री कंगना रानौतने बॉलीवूड कनेक्शनच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले असताना उर्मिला मातोंडकर यांनी सर्वप्रथम तिच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. याशिवाय, उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, राजकीय समज आणि राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठीचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवत असल्याची चर्चा आहे.

सध्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची नावे निश्चित केली जातील. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

काँग्रेसवर आगपाखड करुन सोडचिठ्ठी मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती. 45 वर्षीय उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. उर्मिला यांचे ‘रंगीला’, ‘प्यार तुने क्या किया’, ‘भूत’, ‘कौन’ यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिला यांच्या डान्सचेही चाहते आहेत. त्यांनी काही रिअ‍ॅलिटी शोंचं परीक्षणही केलं आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्या बॉलिवूडमध्ये फारशा दिसल्या नव्हत्या. काही वर्षांपूर्वी ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात त्या झळकल्या. राजकारणातून आपली सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या उर्मिला यांनी अकाली राजकीय एक्झिट घेतल्याची चर्चा होती. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या:

विधान परिषद : उर्मिला मातोंडकरांचे नाव मीडियात चर्चेत, आम्हाला त्याबाबत कल्पना नाही : अनिल परब

उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील – संजय राऊत

Special Report | शिवसेना उर्मिला मातोंडकरांना आमदार करणार?

(urmila matondkar gives green nod to ShivSena proposal for Governor appointed MLC)

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.