Uttar Pradesh : 24 तासांत तीन बड्या नेत्यांचे राजीनामे, योगी आदित्यनाथ, अखिलेश यादवांचाही राजीनामा, काय आहे राजीनाम्यामागचं कारण?

उत्तर प्रदेशात येत्या 25 मार्चला योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. उत्तर प्रदेशवर योगी आदित्यनाथ यांची सलग दुसऱ्यांदा सत्ता आल्याने या शपथविधी सोहळ्याकडे देशभराचं लक्ष लागून आहे. मात्र, या पूर्वी 24 घंट्यामध्ये उत्तर प्रदेशातील तीन बड्या नेत्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांमध्ये सर्वात मोठे नाव योगी आदित्यनाथ यांचे आहे. तर दुसरा राजीनामा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि तिसरा राजीनामा आजम खान यांचा आहे.

Uttar Pradesh : 24 तासांत तीन बड्या नेत्यांचे राजीनामे, योगी आदित्यनाथ, अखिलेश यादवांचाही राजीनामा, काय आहे राजीनाम्यामागचं कारण?
24 तासांत तीन बड्या नेत्यांचे राजीनामेImage Credit source: social
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 5:17 PM

दिल्ली : उत्तर प्रदेशात येत्या 25 मार्चला योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. उत्तर प्रदेशवर योगी आदित्यनाथ यांची सलग दुसऱ्यांदा सत्ता आल्याने या शपथविधी सोहळ्याकडे देशभराचं लक्ष लागून आहे. मात्र, या पूर्वी सोमवारपासून ते मंगळवारपर्यंतच्या 24 घंट्यामध्ये उत्तर प्रदेशातील तीन बड्या नेत्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांमध्ये सर्वात मोठे नाव योगी आदित्यनाथ यांचे आहे. तर दुसरा राजीनामा समाजवादी पक्षाचे (Samajvadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि तिसरा राजीनामा आजम खान यांचा आहे. योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे अखिलेश यादव आणि आजम खान यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशमधील या तिन्ही बड्या नेत्यांच्या राजीनाम्यांची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. या तिन्ही बड्या नेत्यांनी का राजीनामा दिला. यामागचे काय कारण आहे. जाणून घेऊया.

योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा

उत्तर प्रदेशचे काळजीवाहून मुख्यमंत्री योगी आत्यनाथ यांनी सोमवारी रात्री विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, 2017 विधानसभा निवडणुकीनंतर योगी आदित्यनाथ यांना विधिमंडळ पक्षा नेता म्हणून निवडण्यात आलं होतं. त्यावेळी ते गोरखपुरचे खासदार होते. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते विधानपरिषदेचे बिनविरोध सदस्य म्हणून निवडणून आले. त्यांनी विधान परिषदेच्या कार्यकाळातच मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. दुसऱ्यांना योगी आदित्यनाथ यांना निवडणूक लढवण्याचं ठरवलं. त्यावेळी योगी यांनी गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी योगी आदित्यनात यांनी समाजवादी पक्षाच्या सुभावती शुक्ला यांना 1 लाख पेक्षा अधिक मतांनी पराभूत केलाय. आता योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

अखिलेश यादव यांचा राजीनामा

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यावेळी विधानसभा निवडणूक करहल विधानसभा मतदारसंघातून लढवली. त्यांना या जागेवरुन भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एसपी बघेल यांना पराभूत केलं. अखिलेश यादव आझमगडमधून खासदार होते. आता लोकसभेत समाजवादी पक्षाच्या पाच जागा आहेत. यातच असं मानलं जात होतं की अखिलेश यादव हे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील. पण त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जाणकारांच्या मते अखिलेश यादव हे 2027 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करतायेत. यात ते आमदार राहून राज्यातील राजकारणावर फोकस करत आहेत.

आजम खान यांचा राजीनामा

समाजवादी पक्षाचे नेता अखिलेश यादव यांच्यासोबत आजम खान यांनी देखील लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावेळी आजम खान हे रामपूर विधानसभेच्या जागेवरुन लढले होते. रामपूर विधानसभेतून ते जिंकलेही. आता आजम खान यांनी देखील अखिलेश यादव यांच्याप्रमाणे राज्यातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता अखिलेश यादव आणि आजम खान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील दोन जागा खाली झाल्या आहेत. यातच या दोन्ही जागेवर निवडणुका होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

2024 ला मावळमध्ये राष्ट्रवादीकडून पुन्हा Parth Pawar? रोहित पवारांचं सूचक वक्तव्य; तर संजय राऊत म्हणतात…

तर तो माझा शेवटचा क्षण असेल, धनंजय मुंडेंच्या आरोपांवर pankaja munde यांचा पलटवार

Satara : देगावमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, महिलेनं आयोजित केली स्पर्धा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.