प्रकाश आंबेडकर ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्र्यांसोबत 3 मुद्द्यांवर चर्चा

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट (Prakash Ambedkar Meeting CM Uddhav Thackeray) घेतली.

प्रकाश आंबेडकर 'मातोश्री'वर, मुख्यमंत्र्यांसोबत 3 मुद्द्यांवर चर्चा
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 3:58 PM

मुंबई : वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट (Prakash Ambedkar Meeting CM Uddhav Thackeray) घेतली. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सलग एक तास चर्चा झाली. या दोघांमध्ये तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय राजकीय विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील तीन महत्त्वाचे मुद्दे

1. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. याबाबत तपासाबाबत चर्चा झाली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांकडून तपासाबाबत सुरु आहे. याबद्दल रोज उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलणं होत आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

2. त्यानंतर कोळी, भोई या समाजाच्या मागण्यांबद्दल चर्चा झाली. बोगस सोसायटी बनवून मच्छीमारांना दिले जाणारे कॉन्ट्रॅक्ट चुकीचं आहे. हा मुद्दा प्रकाश आंबेडकरांनी बैठकीत उपस्थित केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी यावर काहीतरी ठोसं पावलं उचलू असे सांगितले आहे. (Prakash Ambedkar Meeting CM Uddhav Thackeray)

3. गेल्या काही महिन्यात राज्यात अनुसूचित जातींवर अन्याय अत्याचार होत आहे. त्यावरही प्रकाश आंबेडकर-मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. तसेच अनेक राजकीय विषयही या बैठकीत उपस्थित केले गेले.

हेही वाचा – Vikas Dubey Encounter | गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, STF ची गाडी उलटल्यानंतर पोलिसांशी चकमक

विकास दुबेचा एन्काऊंटर चुकीच्या पद्धतीने 

“कुख्यात गुंड विकास दुबे याचा एन्काऊंटर हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाला आहे. त्याचा एन्काऊंटर करण्याची गरज नव्हती. त्याने सरेंडर केले असते. काही जणांना वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर होता,” असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

“या प्रकरणाची योग्य ती चौकशी होणे गरजेचे आहे. विनय दुबेच्या एन्काऊंटरमुळे त्याला टीप देण्यामागे कोण वरिष्ठ होते हे कळणार नाही. त्याच्या मृत्यूमुळे ही लिंक पूर्णपणे तुटली आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. (Prakash Ambedkar Meeting CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या : 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृह’वर तोडफोड

Dr Ambedkar’s residence Rajgruha CCTV | ‘राजगृह’वरील हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडीओ

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.