राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेच्या पूर्वसंध्येला वसंत मोरे यांच्या फेसबुक लाईव्हने खळबळ! मनातली खदखद समोर

Raj Thackeray Sabha Pune : पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेच्या पूर्वसंध्येलाच समोर आलेल्या या फेसबुक लाईव्हने पुण्यातील मनसेच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.

राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेच्या पूर्वसंध्येला वसंत मोरे यांच्या फेसबुक लाईव्हने खळबळ! मनातली खदखद समोर
वसंत मोरे यांचं फेसबुक लाईव्हImage Credit source: फेसबुक
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 7:06 AM

पुणे : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) पुण्यातील सभेआधी वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्ह (Vasant More Facebook Live) करुन खळबळ उडवून दिली आहे. वसंत मोरे आपल्या 20 समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार, अशी अफवा पसरवली गेली असल्याच वसंत मोरे यांनी यावेळी म्हटलं. माझ्या जवळच्या निलेश माझिरे यांना मनसे माथाडी कामगार सेनेच्या पदावरुन हटवलं गेलं, असंही ते म्हणालेत. पुणे मनसेत झारीतील शुक्राचार्य कोण, हे शोधायला हवं, असंही वसंत मोरे (Vasant More) यांनी म्हटलंय. 14 मिनिटं 30 सेकंदाचं फेसबुक लाईव्ह करुन त्यांनी चुकीच्या बातम्या आमच्याबाबत पसरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केलाय. माझ्यापेक्षा जास्त धक्का निलेश माझिरे यांना बसल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलंय. राज ठाकरेंच्या हस्ते निलेश माझिरेंचा प्रवेश वसंत मोरे यांनी करुन घेतलेला होता. निलेश माझिरे हे पुणे शहरातील वसंत मोरे यांच्यानंतरचा प्रसिद्ध आणि माहीत असलेला चेहरा असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलंय.

1 मिलियन लाईक्स घेणारा शिवसेनेत जाणार?

वसंत मोरे यांनी 1 मिलियन लाईक्स घेणारा निलेश माझिरे यांच्या पुण्यातील कामाचं कौतुक केलंय. निलेश माझिरे एक शहर अध्यक्ष असून त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यावर गदारोळ झाला. कुणी या अफवा पसरवल्या हे मला माहीत नाही. पण खोट्या बातम्या पसरुन निलेश माझिरेंना डावलण्यात आलं असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केलंय.

हे सुद्धा वाचा

मनसेतील पार्ट टाईम कार्यकर्त्यांनी हे काम केल्याचं म्हणत वसंत मोरेंनी निशाणा साधलाय. पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेच्या पूर्वसंध्येलाच समोर आलेल्या या फेसबुक लाईव्हने पुण्यातील मनसेच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.

पाहा संपूर्ण फेसबुक लाईव्ह :

वसंत मोरेंच्या मनातील खदखद

तातडीनं निलेश माझिरेंना हटवण्यात आल्यानं वसंत मोरे यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. मी पुण्यात बांधलेल्या टीमचं खच्चीकरणं केलं जात असल्याची भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे. राज साहेबांना त्रास होईल, अशी कामं मनसेच्या पार्ट टाईम कार्यकर्त्यांकडून सुरु असल्याचा टोला वसंत मोरेंनी लगावलाय. तुम्ही फ्रस्ट्रेट झाले असल्याचं म्हणत वसंत मोरेंनी हल्लाबोल केलाय. प्रत्येक लहान गोष्टीसाठी उठसूठ राज ठाकरेंकडे जायला तुम्ही लहान आहात का, असा सवाल वसंत मोरे यांनी केलाय.

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेच्या पूर्वसंध्येला केलेल्या वसंत मोरे यांनी खळबळजनक माहिती समोर आणली आहे. त्यामुळे पुणे मनसेत काहीही आलबेल नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.