Venkaiah Naidu | ‘जय भवानी, जय शिवाजी’ वादावर व्यंकय्या नायडू यांची पहिली प्रतिक्रिया

"शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत, याची परंपरेनुसार आठवण सभासदांना करुन दिली. अजिबात अनादर केलेला नाही" असे ट्वीट व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

Venkaiah Naidu | 'जय भवानी, जय शिवाजी' वादावर व्यंकय्या नायडू यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jul 23, 2020 | 2:48 PM

नवी दिल्ली : “मी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशंसक, तर देवी भवानीचा उपासक राहिलो आहे. त्यांचा अजिबात अनादर केलेला नाही” असे स्पष्टीकरण राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिले आहे. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने खासदार उदयनराजे यांना व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्याचे काल समोर आले होते. (Venkaiah Naidu Clarification on MP Udayanraje Bhosale Jai Bhavani Jai Shivaji Slogan)

“मी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच खंदा आणि जाहीर प्रशंसक, तर देवी भवानीचा उपासक राहिलो आहे. शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत, याची परंपरेनुसार आठवण सभासदांना करुन दिली. अजिबात अनादर केलेला नाही” असे ट्वीट व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

उदयनराजे यांचे स्पष्टीकरण

महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही” अशा शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीनंतर काही घडलेच नसल्याचा दावा केला आहे.

सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला घेतला, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का तुम्हाला? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं फक्त ते (नायडू) म्हणाले. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला, व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं, पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा, जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही हात जोडून कळकळीची विनंती” असे उदयनराजे म्हणाले.

व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी काही चुकीचं केलं असतं, तर मीच माफीची मागणी केली असती. असंही उदयनराजे म्हणाले.

नेमकं काय झालं?

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात काल (22 जुलै) खासदारकीची शपथ घेतली. भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच खासदारकीची शपथ घेतली. इंग्रजीतून घेतलेल्या शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली.

“I Udayanraje Pratapsinhraje Bhosale…” अशी इंग्रजी भाषेत दमदार आवाजात शपथ घेण्यास उदयनराजेंनी सुरुवात केली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी “जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी” अशी घोषणा दिली.

उदयनराजे यांनी घोषणा दिल्याने सदनात कोणीतरी आक्षेप घेतला. त्यांना उद्देशून व्यंकय्या नायडू म्हणाले, हे संसदेचे सत्र नसून माझे चेम्बर आहे. ते सदनात नवीन सभासद आहेत. हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त लिखित शपथ नोंदवली जाईल.” असे म्हणून “सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या” अशा शब्दात व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

संबंधित बातम्या :

इंग्रजीतून शपथ घेऊन उदयनराजे म्हणाले, जय भवानी, जय शिवाजी, सभापतींकडून समज

व्यंकय्या नायडूंविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक, ब्राह्मण महासंघाकडून माफीची मागणी

 महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता : उदयनराजे भोसले

व्यंकय्या नायडू नियमाने वागले, पण नियम आणि भावना वेगळ्या, शिवराय आमचं दैवत : संजय राऊत

छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान, भाजपचं तोंड बंद का? : संजय राऊत

(Venkaiah Naidu Clarification on MP Udayanraje Bhosale Jai Bhavani Jai Shivaji Slogan)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.