विधानपरिषदेच्या तिकीटासाठी मोर्चेबांधणी सुरु, विदर्भातील काँग्रेस इच्छुक नेत्यांच्या भेटीला

लॉकडाऊनमुळे दिल्लीवारी शक्य नाही, पण संधी मिळावी म्हणून प्रत्येक इच्छुकाने आपापल्या नेत्यांच्या मदतीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. (Vidarbha Congress Leaders Fielding for Vidhan Parishad)

विधानपरिषदेच्या तिकीटासाठी मोर्चेबांधणी सुरु, विदर्भातील काँग्रेस इच्छुक नेत्यांच्या भेटीला
Follow us
| Updated on: May 03, 2020 | 10:57 AM

नागपूर : विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी राज्यात 21 मे रोजी निवडणूक होत आहे. विधानसभा सदस्यांच्या मतांवरुन विधानपरिषदेवरील आमदारांची निवड होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठं यश मिळालं होतं, त्यामुळे क्षेत्रीय समतोल राखत काँग्रेसच्या वाट्याची जागा विदर्भातील इच्छुकांना मिळावी, यासाठी अनेक दिग्गजांनी प्रयत्न सुरु केले आहेत. (Vidarbha Congress Leaders Fielding for Vidhan Parishad)

लॉकडाऊनमुळे दिल्लीवारी शक्य नसली, तरी विदर्भातील काँग्रेसच्या इच्छुक नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. इच्छुकांकडून विदर्भातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत.

विदर्भातील काँग्रेसचे इच्छुक

– ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे – माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक – माजी आमदार डॉ. आशिष देशमुख – प्रवक्ते अतुल लोंढे – प्रफुल्ल गुडधे पाटील – मोहन गायकवाड पाटील, व्यावसायिक – डॉ. बबनराव तायवाडे, ओबीसी नेते

आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी विदर्भातून काँग्रेस इच्छुकांची मोठी यादी आहे. लॉकडाऊनमुळे त्यांना दिल्लीवारी करता येत नाही, पण संधी मिळावी म्हणून प्रत्येक इच्छुकाने आपापल्या नेत्यांच्या मदतीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला पाच जागा येऊ शकतात, त्यातील काँग्रेसच्या वाट्याला मिळालेली जागा विदर्भातील इच्छुकाला मिळावी, अशी विदर्भातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची इच्छा आहे. आता कोणाच्या पारड्यात पसंतीचं मत पडणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. (Vidarbha Congress Leaders Fielding for Vidhan Parishad)

विधानपरिषदेचं चित्र काय?

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत. आघाडीकडे 173, तर भाजपकडे 115 आमदारांची बेगमी आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार 5 जागी जिंकणार, हे निश्चित आहे. भाजपला तीन जागा सहज जिंकणे शक्य आहे. अपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे.

कोणत्या जागांसाठी निवडणूक

24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक अपेक्षित आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.

(Vidarbha Congress Leaders Fielding for Vidhan Parishad)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.