Video : शाईफेकीच्या घटनेनंतर अमरावतीच्या आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया काय? रवी राणांचाही गंभीर आरोप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

घटनेपूर्वी मला फोन करुन बोलावण्यात आलं. माझ्या अंगावर शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आष्टीकर यांनी केलाय. तर प्रवीण आष्टीकर यांची अमरावतीमध्ये पैसे देऊन पोस्टिंग करण्यात आल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय. या प्रकारामुळे अमरावतीत मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

Video : शाईफेकीच्या घटनेनंतर अमरावतीच्या आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया काय? रवी राणांचाही गंभीर आरोप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
अमरावती महापालिका आयुक्तांवर शाईफेक
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 7:48 PM

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरुन अमरावतीतील (Amravati) राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यामुळे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आज महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (Pravin Ashtikar) यांच्यावर शाई फेकून निषेध नोंदवला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आयुक्तांना पुतळा का हटवला याचा जाब विचारत त्यांच्या अंगावर थेट शाई फेकली. या प्रकारानंतर आता अमरावतीच्या आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. घटनेपूर्वी मला फोन करुन बोलावण्यात आलं. माझ्या अंगावर शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आष्टीकर यांनी केलाय. तर प्रवीण आष्टीकर यांची अमरावतीमध्ये पैसे देऊन पोस्टिंग करण्यात आल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय. या प्रकारामुळे अमरावतीत मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर दुपारी दीड वाजताच्या सुमारास तीन महिलांनी शाई फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी आता महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजापेठ उड्डाणपुलाखाली असलेल्या अंडर बायपास मध्ये पाणी साचत असल्याने ते पाहणी करण्यासाठी मला एका कंत्राटदाराचे 9 वेळा फोन आले. तसेच आमदार येत आहे असा मला निरोप देण्यात आला. मी जेव्हा त्या भागाची पाहणी केली तेव्हा माझ्या अंगावर दोन महिला धावून आल्या आणि त्यांनी शाहफेक करून मला धक्काबुकी केली असा आरोप आयुक्त प्रविण आष्टीकर यांनी केला आहे. हल्ला करणाऱ्या चार जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असल्याची माहितीही आष्टीकर यांनी दिली आहे.

Amravti Shaifek

अमरावती महापालिका आयुक्तांवर शाईफेक

आष्टीकर यांची अमरावतीत पैसे देऊन पोस्टिंग, रवी राणांचा आरोप

आयुक्तांवरील शाईफेकीचं आपण समर्थन करत नसल्याचं आमदार रवी राणा यांनी म्हटलंय. मात्र शिवप्रेमी आक्रमक झाले, त्यांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं. आष्टीकर यांनी पैसे देऊन अमरावतीत पोस्टिंग घेतली आणि त्यांनी दोन महिन्यांत 4 ते 5 कोटी रुपये 3 टक्के कमिशन घेत कंत्राटदारांकडून कमावल्याचा गंभीर आरोपही रवी राणा यांनी केलाय. इतकंच नाही तर मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी चमचेगिरी करु नये असा उपरोधिक सल्लाही राणांनी दिलाय.

अमरावतीत नेमकं काय घडलं?

पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिकेच्या आवारात आज दुपारी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकासोबत कचऱ्याची पाहणी करत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. ओपन स्पेस असल्याने या ठिकाणी दोन महिला आल्या. त्यांना सुरक्षा रक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका महिलेने आपल्या पिशवीतून एक बॉटल काढली. त्यात काही तरी असल्याचं लक्षात आल्याने आष्टीकर सतर्क झाले अन् ते जीवाच्या आकंताने पळाले.

आयुक्त एका रिक्षाच्या मागे जात असतानाच एका महिलेने त्यांना घेरले अन् बिसलेरीची बाटली भरून आणलेली शाई आयुक्तांच्या अंगावर ओतली. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने तेवढ्यात धाव घेऊन आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या सुरक्षा रक्षकाने आयुक्तांना लहान लेकरासारखं कवटाळून धरत या महिलांपासून त्यांचा बचाव केला. त्यानंतर या महिला धावतच पळून गेल्या. जाताना या महिलांनी जय भवानी, जय शिवाजीचे नारे दिले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

इतर बातम्या :

Nitesh Rane : जामीन मिळूनही नितेश राणेंची आजची रात्र रुग्णालयातच, डॉक्टरांनी सांगितलं कारण

संजय राऊत तुम्हची जागा आता “आत”, धमक्या देण्याचे दिवस संपले; नारायण राणेंचा गर्भित इशारा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.