Video : काँग्रेस आमदाराला भागवत कराडांची खुली ऑफर! कैलास गोरंट्याल ‘कमळ’ हाती घेणार?
एकमेकांचे आमदार आणि नेते फोडाफोडीचं राजकारणही सर्वच राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. अशावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना थेट भाजप प्रवेशाची ऑफर देऊन टाकलीय! कराड यांच्या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात आता चांगलीच चर्चा रंगलीय.
जालना : महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) दोन वर्षे उलटली आहेत. महाविकास आघाडी सरकार कोसळणार असं वक्तव्यही भाजप नेत्यांकडून सातत्यानं केली जात आहेत. तर सरकार पाडण्यासाठीच केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) वापर भाजपकडून केला जात असल्याचा आरोपही महाविकास आघाडीचे नेते करत आले आहेत. या काळात एकमेकांचे आमदार आणि नेते फोडाफोडीचं राजकारणही सर्वच राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. अशावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांना थेट भाजप प्रवेशाची ऑफर देऊन टाकलीय! कराड यांच्या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात आता चांगलीच चर्चा रंगलीय.
जालन्यातील एका कार्यक्रमात बोलताना भागवत कराड यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांना भाजप प्रवेशाची ऑफरच देऊन टाकलीय. ‘जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले होते की विकासाठी ते कमळासोबत असतात. पण तुम्ही जर कायमच आमच्यासोबत आलात तर जालन्याचा विकास चांगला होईल, जालना जिल्ह्याचा विकास चांगला होईल, अशी खुली ऑफरच भागवत कराड यांनी गोरंट्याल यांना जाहीर व्यासपीठावरुन दिलीय.
मराठवाड्यात नव्या रेल्वे लाईनसाठी महत्वाची मागणी
दरम्यान, आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या उपस्थितीत संपूर्ण देशातील रेल्वे विद्युतीकरणाबाबत कार्यक्रम पार पडला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच संपूर्ण देशभरात रेल्वे विद्युतीकरण होतील. पायाभूत सुविधा नुसत्या कागदापुरत्या मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष उतरवण्याचे कार्य भाजपच्या माध्यमातून निरंतर सुरु आहे. यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी आणि एकूणच अडचणी लक्षात घेत, लातूर-नांदेड, संभाजीनगर-अहमदनगर-पुणे, तसंच उत्तर भारतातून मराठवाड्यात अशा नवीन रेल्वे लाईन जोडणीची कामे व्हावी. अशी मागणी वजा विनंती कार्यक्रमाचे अध्यक्ष व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. यावेळी अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक, माता-भगिनी प्रचंड संखेने उपस्थित होते’ अशी माहिती भागवत कराड यांनी ट्विटरवरुन दिलीय.
याप्रसंगी औचित्य साधून प्रवासांच्या सोयीसाठी आणि एकूणच अडचणी लक्षात घेत, लातुर – नांदेड, संभाजीनगर – अहमदनगर – पुणे तसेच उत्तर भारतातुन मराठवाडात अशा नवीन रेल्वे लाईन जोडणीची कामे व्हावी,
— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) March 12, 2022
इतर बातम्या :