Video : खासदार प्रीतम मुंडे पत्रकारांवर भडकल्या! नेमकं कारण काय?
खासदार डॉ. प्रीतम मुंडे या आपल्या शांत आणि संयमी स्वभावामुळे ओळखल्या जातात. त्यांची भाषणंही भाजप नेत्या आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यापेक्षा नक्कीच सौम्य असतात. मात्र, याच प्रीतम मुंडे आज पत्रकारांवरच भडकल्याचं पाहायला मिळालं. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रीतम मुंडे यांचा पारा चढला.
बीड : भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे या आपल्या शांत आणि संयमी स्वभावामुळे ओळखल्या जातात. त्यांची भाषणंही भाजप नेत्या आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यापेक्षा नक्कीच सौम्य असतात. मात्र, याच प्रीतम मुंडे आज पत्रकारांवरच भडकल्याचं पाहायला मिळालं. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रीतम मुंडे यांचा पारा चढला. त्यांनी पत्रकारांना एकप्रकारे त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुण देण्याचा प्रयत्न केला! (BJP MP Dr. Pritam Munde got angry with the journalists)
त्याचं झालं असं की बीड जिल्ह्यात देवस्थानच्या जमिनीत मोठा गैरव्यवहार झालाय. तुम्ही मंदिर उघडावेत यासाठी आग्रही होता आणि त्यानंतर सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिली. मात्र त्याच मंदिरांच्या हडप केलेल्या जमिनीसाठी आपण आंदोलन करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. यावर खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, की जिथे जिथे अन्याय होताना दिसतो, तिथं तिथं आवाज उचलेन. हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते आम्ही निश्चित करू’. असं सांगत मुख्य प्रश्नाला मुंडे यांनी बगल दिली. परंतु मुंडे यांच्याकडून प्रश्नाचे योग्य उत्तर न मिळाल्याने माध्यम प्रतिनिधींनी पुन्हा प्रश्न केला असता खासदार प्रीतम मुंडे भडकल्या.
प्रीतम मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
‘ऑन द रेकॉर्ड आणि ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला कसं वाजवायचं तसं वाजवा. खासदार म्हणून जशी माझधी जबाबदारी, तशीच पत्रकार म्हणून तुमची जबाबदारी आहे. विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला खासदारांचा आवाज सक्षम वाटत नसेल तर मला माफ करा, मीडिया म्हणून मलाही तुमचा आवाज सक्षम वाटत नाही’, अशा शब्दात प्रीतम मुंडे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं.
‘नाचता येईना, अंगण वाकडं’ अशी सरकारची अवस्था
प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. स्वत:चा दोष दाखवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम राज्य सरकार करतं. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्याचे पाप या राज्य सरकारनं केलं. जर सगळे दोष केंद्राचे असतील तर राज्य चालवण्यासाठीही केंद्राकडे द्या, असा जोरदार टोला प्रीतम मुंडे यांनी लगावलाय. प्रीतम मुंडे आज बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
‘नाचता येईना, अंगण वाकडं’ असं राज्य सरकारचं काम आहे. नव्या गाड्या, बंगल्यांची डागडुजी करण्यासाठी पैसे आहेत. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत. रोज सकाळी पत्रकारांसमोर विचार मांडायचे आणि राजकीय टिप्पणी करायची असं काम या सरकारचं सुरु आहे. समाजातील कुठलाही वर्ग या सरकारच्य कामगिरीवर समाधानी नाही, असा घणाघात प्रीतम मुंडे यांनी केलाय.
इतर बातम्या :
‘तलवार नही, कलम जिंदा रखेगी तुमको’, सोलापुरात ओवेसींकडून ‘फुले आंबेडकरांचा’ धडा, नेमके काय म्हणाले?
BJP MP Dr. Pritam Munde got angry with the journalists