Video : “शिवसेना आणि ‘हाता’च्या नादाला लागल्यापासून ‘घड्याळा’ची वेळ चुकतेय!”, जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी, उपस्थितांमध्ये हशा

सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसवर मिश्किल टिप्पणी केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ आहे. मात्र, शिवसेना आणि हाताच्या नादी लागल्यापासून घडाळ्याची वेळ चुकत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

Video : शिवसेना आणि 'हाता'च्या नादाला लागल्यापासून 'घड्याळा'ची वेळ चुकतेय!, जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी, उपस्थितांमध्ये हशा
जयंत पाटीलांकडून पुतळा बसवण्याच्या कामाला वेग
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 7:39 PM

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे आपली भाषणशैली आणि विरोधकांना खोचक शब्दात प्रत्युत्तर देण्यासाठी ओळखले जातात. आता सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटकपक्ष असलेल्या काँग्रेसवर मिश्किल टिप्पणी केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ आहे. मात्र, शिवसेना आणि हाताच्या नादी लागल्यापासून घडाळ्याची वेळ चुकत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्याचं झालं असं की या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) काहीसे उशिरा पोहोचले, त्यामुळे कार्यक्रमालाही काहीसा उशीर झाला. त्यावरुन जयंत पाटील यांनी वरील टिप्पणी केलीय.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जयंत पाटील यांनाही या कार्यक्रमाला पोहोचण्यासाठई काहीसा उशीर झाला. त्यामुळे भाषणाला उभं राहिल्यानंतर त्यांनी उपस्थित लोकांची माफी मागितली. राज्यमंत्री विश्वजित कदम याची वाट पाहत बसावं लागलं आणि कार्यक्रम सुरु होण्यास वेळ लागला, असं जयंत पाटील म्हणाले. तसंच शिवसेना आणि हाताच्या नादी लागल्यापासून घडाळ्याची वेळ चुकत आहे, असं मिश्किल वक्तव्यही त्यांनी केलं. हे वक्तव्य केल्यानंतर उपस्थित माध्यम प्रतिनिधींना हे लगेच छापू नका, असंही पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

दरम्यान, धनुष्यबाण, घड्याळ आणि हात एकत्रित आल्यापासून या जिल्ह्यात सहकार क्षेत्रात चांगली ताकद निर्माण झाली आहे. लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

इतर बातम्या :

TV9 Final Opinion Poll : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार समाजवादी पार्टीसोबत, भाजप चौथ्या क्रमांकावर

PM Narendra Modi : कोरोना काळातील स्थलांतरावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसवर गंभीर आरोप, काय म्हणाले मोदी?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.