Video : सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस! खासदार उदयनराजे म्हणतात, ‘गरीब शेतकरी सभासदांची जिरवू नका’

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची नोटीस आली आहे. याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारणा केली. त्यावेळी ही बाबत न्यायप्रविष्ठ असल्यामुळे माहिती देता येणार नसल्याचं पत्र जिल्हा बँकेकडून उदयनराजेंना पाठवण्यात आलंय. त्यानंतर उदयनराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

Video : सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस! खासदार उदयनराजे म्हणतात, 'गरीब शेतकरी सभासदांची जिरवू नका'
उदयनराजे भोसले, खासदार, सातारा
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 2:00 PM

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची नोटीस आली आहे. याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारणा केली. त्यावेळी ही बाबत न्यायप्रविष्ठ असल्यामुळे माहिती देता येणार नसल्याचं पत्र जिल्हा बँकेकडून उदयनराजेंना पाठवण्यात आलंय. त्यानंतर उदयनराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. ही बँक गरीब शेतकरी सभासदांची आहे ती राहू द्या. त्यांची जिरवू नका, ही विनंती, असं उदयनराजे हात जोडून म्हणाले. (MP UdayanRaje Bhosale’s Agressive reaction over ED notice to Satara District Bank)

अनेकांना वाटत असेल की मला मस्ती आलीय. मेहरबानी करा माझी कुणी जिरवू नका. मी कुणाचा दुश्मन नाही. ही बँक गरीब शेतकरी सभासदांची आहे. ही बँक राहूद्या. त्यांची जिरवू नका ही विनंती. ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठे जायचं. कुठल्याही परिणामांना मी घाबरत नाही. व्हायचं ते होऊ द्या, असं उदयनराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

‘जरंडेश्वर’ प्रकरणी सातारा जिल्हा बँकेला जुलैमध्ये नोटीस

दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीती नोटीस आली होती. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिमणगावमधल्या चर्चित जरंडेश्वर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस पाठवण्यात आली होती. सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वरला 96 कोटींचे कर्ज दिले असल्याच्या खुलाशाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा बँकेने कर्ज देताना कोणत्या आधारावर दिलं, कागदपत्रांची पूर्तता नेमकी कशी केली गेली होती, कर्ज प्रकरणाची प्रोसेस नेमकी कशी झाली, ही प्रोसेस होताना नियम आणि अटींचं पालन झालं होतं का? अशा पद्धतीने ईडी तपास करण्याची शक्यता होती.

त्यानंतर आता यातून ईडी या कर्जाची संचालकांकडून वसुली करणार आहे. जे संचालक या जबाबदार आहेत, त्यांच्याकडून वसुली व्हावी. हे बँकेवर निवडून जातात आणि आम्ही गेलो की जागा अडवली काय? मी जागा अडवली असेल तर मग सगळ्यांनाच बाहेर काढा. ज्यांनी-ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या त्यांनी दहा तारखेच्या आत जिल्हा बँकेतून अर्ज मागे घ्यावेत. तसं झालं तर माझी सपशेल माघार असेल, असं आव्हानच उदयनराजे यांनी बँकेचे अध्यक्ष आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना दिलं आहे.

पॅनेलमध्ये मी का नाही? उदयनराजेंच्या प्रश्नावर शिवेंद्रराजे म्हणतात…

राष्ट्रवादीप्रणित सर्वसमावेशक पॅनेलमध्ये मी का नाही?, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. त्यावर हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा पवारसाहेबांना विचारा, असं म्हणत उदयनराजेंचा बॉल पुन्हा त्यांच्याच कोर्टात शिवेंद्रराजेंनी ढकललाय.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीप्रणित सर्वसमावेशक पॅनलमध्ये अद्याप तरी जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी दबाव तंत्राचा वापर करत बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे संचालक मंडळ यांना खिंडीत पकडायला सुरुवात केली आहे.

उदयनराजेंना पॅनल मध्ये का घेतले नाही या विषयी त्यांनी रामराजे, शरद पवार, अजित पवार यांच्याशी बोलून घ्यावे. साताऱ्यात जे काय होतंय ते सर्व उदयनराजेंमुळे होत असल्याचा टोमणा मारत सातारला ऑक्‍सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता मात्र तो सुद्धा उदयनराजेंनी सुरु केला, अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंची नक्कल केली. ते त्यांच्याच स्टाईमध्ये चुटकी वाजवून वगैरे…!

इतर बातम्या :

‘दोन-अडीच वर्षे मी ही आर्थर रोड कारागृहात, जे लोक स्वागतासाठी तेच नंतर लक्ष ठेवण्यासाठी’, भुजबळांची सांगितला जेलवारीचा अनुभव

केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा ‘सामना’चा संपादक असणं माझ्यासाठी महत्वाचं- संजय राऊत

MP UdayanRaje Bhosale’s Agressive reaction over ED notice to Satara District Bank

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.