Video: हेच ते वक्तव्य, ज्यावर दत्तात्रय भरणेंना दिलगिरी व्यक्त करावी लागली, नेमकं काय म्हणालेत ते बघा

दत्तामामा यांनी सोलापुरातील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना ओघाने 'मुख्यमंत्र्यांचं जाऊ दा, मरु द्या' असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन सोलापूरचे शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुतरगावकर आणि संपर्कप्रमुख माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दत्तात्रय भरणे यांना इशारा दिलाय. त्यानंतर भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकला आहे.

Video: हेच ते वक्तव्य, ज्यावर दत्तात्रय भरणेंना दिलगिरी व्यक्त करावी लागली, नेमकं काय म्हणालेत ते बघा
अर्थ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 3:46 PM

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे वादात सापडले आहेत. दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. दत्तामामा यांनी सोलापुरातील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना ओघाने ‘मुख्यमंत्र्यांचं जाऊ दा, मरु द्या’ असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन सोलापूरचे शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुतरगावकर आणि संपर्कप्रमुख माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दत्तात्रय भरणे यांना इशारा दिलाय. त्यानंतर भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकला आहे. (Dattatraya Bharane’s controversial statement about CM Uddhav Thackeray)

दत्तामामा नेमकं काय म्हणाले?

गटनेत्यांनी, नगसेवकांनी, आयुक्तांनी मला परवानगी दिली आहे. इथं चांगलं गार्डन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक कोटी रुपये निधी द्यायचा आहे. तुमचा प्रस्ताव कधी येईल मला? असं बोलत असताना एका महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं असता ते मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या, मरु द्या, आपलं आपण करु. मुख्यमंत्र्यांकडून आपण मोठा निधी घेऊ. आपण आपल्या पातळीवरुन सुरुवात करु. कलेक्टर आहेत, तुम्ही आहेत, आयुक्त आहेत. आपण सुरुवात करुया, असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं होतं. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं.

दत्तात्रय भरणे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

मुख्यमंत्री आमचे नेते आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. आता भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर स्थानिक पातळीवर सुरु झालेल्या या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री तानाजी सावंतांचा भरणे यांना इशारा

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दत्तात्रय भरणे यांना सज्जड दम दिलाय. भरणे मामा तुम्ही औकातीत राहा. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे यांच्या जिवावर तुम्ही सत्तेत आहात. तुम्हाला जनतेनं फेकुन दिलं होतं. भरणे यांची हिम्मत असेल तर त्यांनी उजनीची सीमा ओलांडून दाखवावी. शिवबंधनाची ताकद पहायची आहे का. महाविकास आघाडी आहे आणि आमच्यावर बंधन आहे म्हणून आम्ही शांत आहोत. आमच्यावर काही बोलून छातीवर ठोकायची वेळ येऊ देऊ नका. भरणे यांना योग्य वेळी शिवसैनिकांच्या माध्यमातून उत्तर देऊ, असा इशाराच तानाजी सावंत यांनी दिला आहे.

इतर बातम्या :

दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने सांगलीकरांसाठी जयंत पाटील यांचं महत्वाचं पाऊल; कोणता महत्वाचा निर्णय?

मोदी म्हणतात, भारत-पाक फाळणीचा स्मृती दिन साजरा करणार; पटोले म्हणातात, हा तर देशांतर्गत फाळणीचा डाव

Dattatraya Bharane’s controversial statement about CM Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.