Shivsainik Crying: रामदास कदम रडले, बांगर रडले पण या सर्व सामान्य शिवसैनिकाच्या डोळ्यातील अश्रूंनी सगळ्यांनाच रडवले; आदित्य ठाकरेंच्या सभेतील व्हिडिओ तुफान व्हायरल

आदित्य ठाकरे 'निष्ठा यात्रा' घेऊन महाराष्ट्र पिंजून काढत शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या एका सभेत शिवसैनिक रडताना पहायला मिळला.

Shivsainik Crying: रामदास कदम रडले, बांगर रडले पण या सर्व सामान्य शिवसैनिकाच्या डोळ्यातील अश्रूंनी सगळ्यांनाच रडवले; आदित्य ठाकरेंच्या सभेतील व्हिडिओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 6:55 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. . एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता शिवसेना कुणाची यावरुन वाद सुरु झाला आहे. या दरम्यान अनेक नेत्यांनी डोळ्यात अश्रू काढत शिवसेने प्रती आपली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला. रामदास कदम रडले, बांगर रडले या नेत्यांच्या डोळ्यातील अश्रू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. मात्र, एका सर्व सामान्य शिवसैनिकाच्या डोळ्यातील अश्रूंनी सगळ्यांनाच रडवले आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सभेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला. आदित्य ठाकरेंचे भाषण सुरु असताना एक शिवसैनिक रडत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेना हादरवून सोडली आहे. त्यामुळे उरलेल्या शिवसैनिकांना आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न सध्या आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांनी सुरु केलेल्या ‘निष्ठा यात्रे’ सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळेचआदित्य ठाकरे ‘निष्ठा यात्रा’ घेऊन महाराष्ट्र पिंजून काढत शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या एका सभेत शिवसैनिक रडताना पहायला मिळला.

आदित्य ठाकरेंच्या गंगापूर येथील एका सभेदरम्यानच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आदित्य ठाकरेंचे स्टेजवर भाषण सुरु असताना एक शिवसैनिक शिवसैनिक अक्षरश: रडताना दिसत आहे. या व्हिडिओने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले आहे.

एकनाथ शिंदे यांची बंडखोरी पाहून आमदार संतोष बांगर रडले, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका म्हणून हात जोडले आणि नंतर तेच शिंदे गटात सामील झाले. तर रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर ते देखील प्रसारमाध्यमांसोमर ढसाढसा रडले आणि शिंदे गटाला जाऊन मिळाले. मात्र, आदित्य ठाकरेंच्या सभेत रडणाऱ्या या सर्व सामान्य शिवसैनिकाच्या अश्रूंनी सगळ्यांचे मन हळवे करुन टाकले आहे. हीच खरी निष्ठा असं म्हणत हा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

सर्व दौऱ्यांमध्ये सभांमध्ये आदित्य ठाकरे या बंडखोरांचा उल्लेख गद्दार असा करत आहेत. यांनी विश्वास घात केलाय. मात्र, खरी शिवसेना आपलीच आहेत ज्यांना असं वाटत असेल की गद्दारी केली, विश्वासघात केला असं वाटत असेल तर मातोश्रीवर परत या, आमचं मन मोठं आहे असे म्हणत आदित्य ठाकरे या आमदारांना परत येण्याचे आवाहनही करत आहेत.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....