Video : चुकीला माफी नाही, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्याच्या पाठीवर दणका! नेमकं कारण काय?

अंगार-भंगार घोषणा काय देताय… हे वागणं शोभतं का तुम्हाला… असा प्रकार मला चालणार नाही, परत येऊ नका मला भेटायला, अशा शब्दात त्यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना झापलं. इतकंच नाही तर पंकजा यांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या पाठीवर दणका दिल्याचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही आपल्या कार्यकर्त्यांना कडक शब्दात समज दिली आहे.

Video : चुकीला माफी नाही, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्याच्या पाठीवर दणका! नेमकं कारण काय?
पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 7:01 PM

परळी : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रा आजपासून सुरु करण्यात आली. गोपीनाथ गडावरुन या यात्रेची सुरुवात झाली. मात्र, यात्रेपूर्वी परळीत मोठा राडा पाहायला मिळाला. भागवत कराड परळीत दाखल झाले त्यावेळी मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. या संपूर्ण प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी चुकीच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता पंकजा यांनी एका कार्यकर्त्याच्या पाठीवर झपका दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (Pankaja Munde slapped the party activist who was shouting slogans)

भागवत कराड परळीमध्ये दाखल झाले त्यावेळी मोठ्या संख्येनं मुंडे समर्थक तिथे उपस्थित होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी पंकजा आणि प्रीतम यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी पंकजा मुंडे चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. अंगार-भंगार घोषणा काय देताय… हे वागणं शोभतं का तुम्हाला… असा प्रकार मला चालणार नाही, परत येऊ नका मला भेटायला, अशा शब्दात त्यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना झापलं. इतकंच नाही तर पंकजा यांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या पाठीवर दणका दिल्याचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही आपल्या कार्यकर्त्यांना कडक शब्दात समज दिली आहे. पंकजा नेहमी अधिकारवाणीने आपल्या कार्यकर्त्यांना समजावत असतात. हा देखील त्याचाच एक भाग असल्याचं भाजप पदाधिकारी सांगत आहेत.

6 ते 21 ऑगस्टदरम्यान कराडांची यात्रा

भागवत कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या यात्रेची घोषणा केली आहे. “भव्य जनआशिर्वाद यात्रा… दि. 16 ते 21 ऑगस्ट 2021 , मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला”, असं ट्वीट भागवत कराड यांनी केलंय. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोंचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात गोपीनाथ मुंडे यांना त्यांनी ‘आमचं काळीज’ असं म्हटलंय. भागवत कराड आज केंद्रीय राज्यमंत्रीपदी विराजमान झाले असतील तर त्यामागे गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई असल्याचं लोक म्हणतात.

संबंधित बातम्या :

भागवत कराड पंकजाच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची पंकजा-प्रितमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, यात्रेआधीच राडा

Video : जेवढ्या मोठ्या उंचीची मी, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झाप झाप झापलं!

Pankaja Munde slapped the party activist who was shouting slogans

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.