Video : पंकजा मुंडेंनी तुळजाभवानीकडे मागितला कौल, मनातील इच्छा पूर्ण होणार?

मनातील इच्छा बोलून दाखवल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचंही पाहायला मिळालं! यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.

Video : पंकजा मुंडेंनी तुळजाभवानीकडे मागितला कौल, मनातील इच्छा पूर्ण होणार?
पंकजा मुंडेंनी तुळजाभवानीकडे मागितला कौलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 9:02 PM

उस्मानाबाद : राज्याचं कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीकडे (TuljaBhavani) सर्वसामान्यांपासून ते बड्या नेतेमंडळींपर्यंत सर्वचजण आपल्या मनातलं मागणं मागतात. त्याला भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडेही (Pankaja Munde) अपवाद ठरल्या नाहीत. पंकजा मुंडे आज उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हा दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. तसंच आपल्या मनातील इच्छाही त्यांनी देवीकडे व्यक्त केली. मनातील इच्छा बोलून दाखवल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचंही पाहायला मिळालं! यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.

पंकजा मुंडेंनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

पंकजा मुंडेंनी देवीकडे नेमकं काय मागितलं?

पंकजा मुंडे यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या चिंतामणी दगडावर दोन्ही हात ठेवून त्यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. आपली इच्छा पूर्ण होणार की याचा कौल त्यांनी घेतला. त्यावेळी दगड उजव्या बाजूला फिरला आणि पंकजा यांना होकारार्थी कौल मिळाला! त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. यावेळी देवीकडे मागणं मागितलं असं विचारल्यानंतर त्यांनी ते गुपित ठेवणंच पसंत केलं. (चिंतामणी दगडावर हात ठेवून मनातील इच्छा बोलून दाखवल्यानंतर तो दगड उजवीकडे किंवा डावीकडे फिरतो. दगड उजवीकडे फिरल्यास तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते. तर दगड डावीकडे फिरला तर तुमची इच्छा पूर्ण होत नाही, असं बोललं जातं.)

पंकजा मुंडेंनी तुळजाभवानीकडे मागितला कौल

‘आमदारकीबाबत पक्षाकडून विचारणा नाही’

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनीच त्यांचा पराभव केला. त्यानंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून राष्ट्रीय पातळीवर मोठं पद देण्यात आलं. मात्र, पंकजा मुंडे आमदार कधी होणार? असा प्रश्न त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातो. त्याबाबत खुद्द पंकजा यांनाच विचारलं असता विधान परिषदेच्या रिक्त होऊ घातलेल्या जागेवर आमदारकीबाबत पक्षाने आपल्याबरोबर काही चर्चा केली नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी पंकजा यांच्या चेहऱ्यावरील नाराजीचे भाव स्पष्ट जाणवत होते.

इतर बातम्या : 

‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’, सुजात आंबेडकरांच्या राज ठाकरेंवरील टीकेला शालिनी ठाकरेंचं प्रत्युत्तर

संजय राऊतांचं जंगी स्वागत! भातखळकर म्हणतात, ओंगळवाणं प्रदर्शन, तर मुनगंटीवार म्हणतात, ‘गजा मारणेचंही स्वागत झालं होतं’

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.