AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : शिवसेना भाजप वाद; किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट करत भाजपला इशारा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करुन प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशाराही पेडणेकर यांनी भाजपला दिलाय.

Video : शिवसेना भाजप वाद; किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट करत भाजपला इशारा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर
| Updated on: Jun 16, 2021 | 8:39 PM
Share

मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चानं शिवसेना भवनावर मोर्चा काढल्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. काही शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह महिला पदाधिकाऱ्यांनाही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करुन प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशाराही पेडणेकर यांनी भाजपला दिलाय. (Kishori Pednekar warns BJP by tweeting Balasaheb Thackeray’s video)

किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केलाय. ‘कारण नसताना कानफाडात माराल तर तुम्ही म्हणाल की, वा छान मस्त बसली. अजून जोरात मारायला हवी होती. इतका बुळचटपणा बरा नाही. त्याचा फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे, तो शिवसैनिक. नुसत्या टाळ्या मारण्यासाठी हात नको, कानफाडात मारण्यासाठी ते तयार ठेवा’, अशा शब्दात शिवसैनिकांना आक्रमक राहण्याची सूचना देताना बाळासाहेब या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात.

..तर शिवसैनिक गप्प बसणार नाही- पेडणेकर

शिवसेना-भाजपमधील धुमश्चक्रीनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा सज्जड इशारा दिला आहे. शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपच्या कोणत्यातरी एका पोरानं उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. तो शिवसैनिकांनी हाणून पाडलाय, असं सांगतानाच शिवसेना भवनावर मोर्चा काढणं कितपत योग्य आहे याचं उत्तर द्या. तुम्हीही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसणार काय?, असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.

श्रद्धा जाधवांसह 7 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणी अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन संपल्यानंतर आम्ही परत निघालो असताना काही शिवसैनिकांनी मागून येऊन हल्ला केला. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केलाय.

संबंधित बातम्या : 

Video : ‘परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पोलीस आणि सरकार जबाबदार’, प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Video : ‘शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली’, शिवसेना भवनासमोरील राड्यावरुन आशिष शेलारांचा घणाघात

Kishori Pednekar warns BJP by tweeting Balasaheb Thackeray’s video

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.